वेल डन सिंधू

वेल डन सिंधू

बासेल : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिनं आज भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नावं कोरलं आहे. सलग तिसऱ्या वेळेला सिंधूने अंतिम फेरीत प्रवेश केला केला होता. २०१७मध्ये याच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ओकुहाराने सिंधूला पराभत केले होते. त्याच पराभवाची सल सिंधूच्या मनात होती. आज, सिंधूने पराभवाची व्याजासह परतफेड करताना ओकुहारला सामन्यात परतण्याची संधीही दिली नाही. सिंधू वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक मिळवणारी ही पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू बनली आहे. स्वित्झर्लंडच्या बासेलमध्ये झालेल्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अंतिम सामन्यात सिंधूने जपानच्या निजोमी ओकुहारा हिचा २१-७, २१-७ असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. यापूर्वी १९८३मध्ये प्रकाश पादुकोण यांनी वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये ब्राँझ पदक पटकावले होते. चॅम्पियनशीपच्या पदकाजवळ पोहोचलेले ते पहिले भारतीय होते. त्यानंतर २०१९मध्ये सिंधूने सुवर्ण पदक मिळवून पहिली भारतीय महिला बॅटमिंटनपटू होण्याचा मान मिळवला. यापूर्वी सायना नेहवालने २०१६मध्ये जकार्तामध्ये झालेल्या या स्पर्धेत रौप्य पदक मिळवले होते. त्यावेळी स्पर्धेच्या रौप्य पदकापर्यंत जाणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती.

सिंधूचा आक्रमक खेळ


सामन्यात पहिल्या गेमची सुरुवात २२ शॉट्सच्या रॅलीने झाले. त्यामुळं सामना खूपच रंगतदार होईल असे वाटत होते. पण, सिंधून पहिल्या सर्व्हिसमध्ये पॉइंट गमावला. त्यानंतर सिंधूने ८ गुण मिळवत जोरदार कमबॅक केले. त्यानंतर तिनं मागं वळन पाहिलं नाही. तिच्याकडं ८-२ अशी लीड होती. कोर्टवर उतरल्यापासून आक्रमक असलेल्या सिंधूच्या खेळापुढं ओकुहाराला प्रत्युत्तरच देता येत नव्हतं. बेकपर्यंत सिंधून ११-२ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर सिंधूनं  १६-२, अशी घेतली आणि १६ मिनिटांत २१-७ असा सेट आपल्या नावावर केला. दुसऱ्या सेटमध्येही सिंधूचा खेळ असाच आक्रमक राहिला. सुरुवातीला तिनं दोन पॉइंट्स घेतले होते. त्यानंतर ओकुहाराने तिला आव्हान देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. अर्थातच ती अपयशी ठरली. ब्रेकपर्यंत सिंधूकडं ११-४ अशी लीड होती. त्यामुळं सामना तिच्या नावावर झाल्याचं दिसत होतं. ओकुहारानं सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला खरा पण, सिंधूनं तोपर्यंत सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती.
WebTittle: Marathi News Well done Sindhu 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com