बोगस कॉलने उडवली रेल्वेची झोप

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 15 जुलै 2018

मुंबईत अफवांचा बाजार किती गरम झालाय हे पुन्हा एकदा समोर आलंय. पश्चिम रेल्वेवरच्या खार आणि सांताक्रूझ दरम्यानच्या खार सबवेचा काही भाग कोसळल्य़ाची संध्याकाळी अफवा पसरली. या अफवेमुळं सांताक्रूझ ते खार दरम्यानची वाहतूक थांबवून ठेवण्यात आली होती.

तब्बल पंधरा मिनिटं ही वाहतूक थांबवून ठेवण्यात आली होती. रेल्वेच्या तंत्रज्ञांनी खार सबवेची तपासणी केली. हा मार्ग सुस्थितीत असल्याची खात्री पटल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली. पण त्यामुळं पश्चिम रेल्वे आणि प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. अफवा पसरवणाऱ्या लोकांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी होतेय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live