भारतीय रेल्वेत चोरांचा सुळसुळात..लाखो टाॅवेल्स, हजारो बेडशीट्स गेलेत चोरीला.

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

भारतीय रेल्वे ही आपली संपत्ती आहे असं म्हंटलं जातं.. लोकांनी ही बाब अगदीच गांभीर्यानं घेतलीय. कारण रेल्वेतलं सामान लोक आपल्याच घरातील असल्याचं समजून त्या सामानावर बिनधास्त डल्ला मारत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

समोर आलेल्या आकडेवारीतून वेस्टर्न रेल्वेतून तब्बल 1 लाख 95 हजार 778 टॉवेल्स, 81 हजार 736 बेडशीट्स, 55 हजार 573 उशांचे कव्हर, 5 हजार 38 उशा आणि 7 हजार 43 ब्लँकेट्स चोरीला गेल्याचं समोर आलंय.

सोमवारी शब्बीर रोटीवाला या इसमाला रतलाममधून वांद्रे अमृतसर पश्चिम एक्स्प्रेसमधून बेडशीट चोरताना पकडण्यात आलं होतं. इतकंच नाही तर 200 टॉयलेट मग,  हजाराच्या वर नळ, 300च्यावर फ्लश पाईप्सही दरवर्षी चोरीला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  

WebTitle : marathi news western railways blankets and towels stolen from indian railways 

संबंधित बातम्या

Saam TV Live