पश्‍चिम रेल्वेतर्फे गणपती स्पेशल ट्रेन

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 22 जुलै 2018

कणकवली - गणपती उत्सवासाठी मुंबई सेंट्रल आणि बांद्रा ते मंगळूर, थिविमीपर्यत जादा गाड्या 6 ते 23 सप्टेंबर या कालावधीसाठी सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे कोकणातील चाकरमान्यांना यंदा प्रवासाचा दिलासा मिळणार आहे. यापुर्वी मध्यरेल्वे जाहीर केलेल्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने आता नव्याने जाहीर करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांना आरक्षण मिळणार आहे. 

कणकवली - गणपती उत्सवासाठी मुंबई सेंट्रल आणि बांद्रा ते मंगळूर, थिविमीपर्यत जादा गाड्या 6 ते 23 सप्टेंबर या कालावधीसाठी सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे कोकणातील चाकरमान्यांना यंदा प्रवासाचा दिलासा मिळणार आहे. यापुर्वी मध्यरेल्वे जाहीर केलेल्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने आता नव्याने जाहीर करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांना आरक्षण मिळणार आहे. 

मुंबई सेंट्रल- मंगळूरु जंक्‍शन ते मुंबई सेंट्रल ही विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 09001 मुंबई सेंट्रल येथून 12 व 19 सप्टेंबरला रात्री 23.50 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी 19.30 वाजता मंगळूरला पोहेचेल. तेथून गाडी क्र. 09002 मंगलापूरहून गुरुवारी 13 आणि 20 सप्टेंबरला रात्री 23.10 वाजता सुटून मुंबई सेंट्रलला सकाळी 7.00 वाजता पोहोचेल. या गाडीला बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, मदुर, थिविम, मडगाव शहर, कारवार, कुमता, भटकळ, मुकाम्बिका रोड बेंदूर येथे थांबेल.

बांद्रा ते मंगळूरु विशेष गाडी क्रमांक 09009 बांद्रा येथून 11 आणि 18 सप्टेंबरला रात्री 23.55 वाजता सुटेल. मंगळूरु जंक्‍शन येथून 12 आणि 1 9 सप्टेंबरला रात्री 23.10 वाजता सुटेल. या गाडीला बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, मदुर, थिविम, मडगाव शहर, कारवार, कुमता, भटकळ, मुकाम्बिका रोड बेंदूर येथे थांबे आहेत.

तसेच बांद्रा ते मंगळूरु वातानुकुलीत विशेष गाडी क्रमांक 09011 ही बांद्रातून 9, 16 आणि 23 सप्टेंबरला रात्री 23.55 वाजता सुटेल. परतीसाठी मंगळूरहुन 10, 17 आणि 24 सप्टेंबरला रात्री 23.10 वाजता सुटेल. ही गाडी बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, मदुर, थिविम, मडगाव शहर, कारवार येथे थांबेल.

मुंबई सेंट्रल ते थिविम विशेष गाडी असून गाडी क्रमांक 09007 मुंबई सेंट्रल येथून सायंकाळी 6 वाजता सुटणार आहे. ही गाडी 8, 10, 13, 15, 17, 20 व 22 सप्टेंबरला निघेल. गाडी क्रमांक 09008 थिविम येथून 7, 9, 11, 14, 16, 18, 21 व 23 सप्टेंबरला थिवीमहून निघणार आहे. या गाडीला बोरीवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि मदुर स्टेशनवर थांबे देण्यात आले आहेत.

अहमदाबाद ते थिविम ही विशेष गाडी 0949 अहमदाबाद येथून सायंकाळी 16.15 वाजता शुक्रवारी 7, 14 आणि 21 सप्टेंबरला सुटेल. परतीसाठी 09417 थिवीम येथून शनिवारी, शनिवार दिनांक 8, 15 आणि 22 सप्टेंबरला सायंकाळी 16.30 वाजतान सुटेल. ही गाडी नडियाद, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, नवसारी, वलसाड, वापी, दहानू रोड, बोईसर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आणि मडुरा स्थानकावर थांबेल.

अहमदाबाद - मडगाव शहर विशेष गाडी क्र. 09416 अहमदाबाद येथून मंगळवार 11 आणि 18 सप्टेंबरला रात्री 9 .30 वाजता सुटेल. परतीसाठी गाडी क्रमांक 09415 मडगांव जंक्‍शन येथून बुधवारी 12 आणि 1 9 सप्टेंबरला सायंकाळी 18.00 वाजता सुचेल. ही गाडी नडियाद, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, वापी, बोईसर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, मदुर आणि थिविम स्थानकांवर थांबेल. 


संबंधित बातम्या

Saam TV Live