इटलीच्या चुकांमधून भारत सावधान! नाही तर भारतातही माजलं असतं कोरोना मृत्यूचं थैमान

इटलीच्या चुकांमधून भारत सावधान! नाही तर भारतातही माजलं असतं कोरोना मृत्यूचं थैमान

कोरोना व्हायरसमुळे जगात सर्वात जास्त मृत्यू कुठे झाले असतील तर ते इटलीमध्ये. तसं कोरोनाची सुरुवात ही चीनमधून झाली असली तरीही त्याचा परिणाम मात्र इतर देशांना भोगावा लागतोय. चीनमधील मृतांचा आकडा इटलीपेक्षा कमी आहे. म्हणजेच इटलीत चीनच्या तुलनेत चौपट मृत्यू झालेत. चीनच्या  वुहान शहरातून हा कोरोना सर्व जगात पसरत गेला. चीननं हे सगळं थांबवलं मात्र इटली इतक्या भयावह स्थितीत कसं जाऊन पोहचलं? इटली हा युरोपमधला अगदी प्रगत देश आहे. अनेक लोक इथे पर्यटनासाठी येत असतात.  आणि ह वुहान शहर इटलीच्या 8500 किमी दूर आहे. तरीही इटलीत अशी भयंकर परस्थिती कशी निर्माण झाली ते पाहुयात. आणि इटलीकडून अशा कोणत्या चुका झाल्या ज्या भारतानं टाळल्या पाहिजे होत्या. आणि त्या टाळल्या आहेत का? त्याचा काही उपयोग झालाय का? 

कोरोनाव्हायरसच्या जागतिक साथीच्या सुरुवातीच्या काळात २४ मार्चला देशात लॉकडाउन जाहीर झाला नसता तर देशातील कोरोना विषाणूंच्याबाधितांची संख्या आत्तापर्यंत ८ लाख २० हजारांवर पोचली असती. इटलीसारखा हाहाःकार उडाला असता, असे निरीक्षण भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) ताज्या अहवालात नोंदविण्यात आले आहे. 

‘आयसीएमआर’च्या अहवालात म्हटले आहे की लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय जरकेंद्र सरकारने मार्चच्या शेवटच्या आठवड्यात केला नसता तर १५ एप्रिलपर्यंत देशातील हजारोंच्या रुग्णसंख्येने किमान ८ लाख २० हजारांचा टप्पा ओलांडला असता. या अहवालाबाबतची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून विदेशी पत्रकारांना देण्यात आली. 

परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विकास स्वरूप यांनी ही माहिती देताना याचा उल्लेख केला आहे. लॉकडाउन देशात अत्यंत योग्य वेळेला लागू करण्यात आले, असे ‘आयसीएमआर’चे प्रमुख डॉक्टर रमण गंगाखेडकर यांनी नुकतेच स्पष्ट केले होते. 

लॉकडाउन जारी केले नसते तर भारतासारख्या १३० कोटी लोकसंख्येच्या प्रचंड देशांमध्ये कोरोनाव्हायरसचे संक्रमण वेगाने पसरले असते आणि एक धोकादायक आणि हाहाःकार उडवणारी परिस्थिती निर्माण झाली असती. तशी परिस्थिती सावरणे देश आणि राज्याच्या यंत्रणांना अत्यंत कठीण गेले असते, असेही या संस्थेचे निरीक्षण आहे. 

भारतात अजून संकट टळलेले नाही. आरोग्य मंत्रालयाच्या दाव्यानुसार देशातील सध्याची कोरोना संशयित रुग्णांची संख्या सहा हजार ४१२ आहे. पण कोरोनाची लागण झाल्याचे निश्चित झालेल्यांची संख्या पाच हजारांच्या घरात आहे.

भारतातील रुग्णसंख्येच्या ८० टक्क्याहून जास्त लोक दिल्ली, मुंबई, पुणे, इंदोर, कासारगोड, हैदराबाद यासह ७८ जिल्ह्रयांपुरतेच मर्यादित आहेत. हा ताजा अहवाल ‘RO २.५’ या सिद्धांतावर आधारित आहे. 

परिस्थिती गांभिर्याने हाताळली नाही
दरम्यान, याच आयसीएमआरच्याच फेब्रुवारीत प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारतामध्ये लॉकडाउन लागू करणे हे योग्य नसल्याचे निरीक्षण मांडले गेले होते. प्रणव चटर्जी आणि इतर ज्येष्ठ संशोधकांनी तो निरीक्षण अहवाल सादर केला होता. भारतात लॉकडाउन लागू केले आरोग्य यंत्रणेला त्याचे दीर्घकालीन परिणाम भोगावे लागू शकतात, अशी भीती त्या अहवालात व्यक्त करण्यात आली होती. 

इटली, स्पेनला उशिरा जाग 
चीनमध्ये कोरोनाव्हायरसचा उद्रेक झालेला असताना भारताने आधीपासून काही उपाययोजना करण्यास सुरुवात केली. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारीला आढळला. मात्र १७ जानेवारीपासूनच आंतरराष्ट्रीय विमानतळांवर येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यास परराष्ट्र मंत्रालयाच्या यंत्रणांनी सुरुवात केली होती. असे उपायांची अंमलबजावणी इटलीने २५ दिवसांनंतर, तर स्पेनने कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर ३९ दिवसानंतर केली होती याकडेही जाणकार लक्ष वेधतात. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com