BIG BREAKING | आरे वाचवलं प्रियदर्शनीचं काय?

सिध्दी सोनटक्के
शनिवार, 7 डिसेंबर 2019

आरेमधील मेट्रोच्या कारशेडसाठी तोडण्यात आलेल्या झाडांना शिवसेनेनं मोठा विरोध केला होता. त्यातच आता औरंगाबादमध्ये होणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी तब्बल ५ हजार झाडांची कत्तल केली जाणार आहे. या उद्यानात हे स्मारक उभारायचे असल्यास त्यासाठी ५ हजार झाडांची कत्ताल करावी लागणार असल्याचं मत पर्यावरण तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलं आहे. तसंच या विरोधात ग्रीन औरंगाबाद फोरमच्या माध्यमातूनही आंदोलन उभारण्यात आलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एकूण ६४ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.

आरेमधील मेट्रोच्या कारशेडसाठी तोडण्यात आलेल्या झाडांना शिवसेनेनं मोठा विरोध केला होता. त्यातच आता औरंगाबादमध्ये होणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी तब्बल ५ हजार झाडांची कत्तल केली जाणार आहे. या उद्यानात हे स्मारक उभारायचे असल्यास त्यासाठी ५ हजार झाडांची कत्ताल करावी लागणार असल्याचं मत पर्यावरण तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलं आहे. तसंच या विरोधात ग्रीन औरंगाबाद फोरमच्या माध्यमातूनही आंदोलन उभारण्यात आलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एकूण ६४ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.  आरेमधील झाडांच्या कत्तलीला शिवसेनेनं विरोध केला असतानाच तोच न्याय औरंगाबादमधील प्रियदर्शनी उद्यानाला मिळणार का असा सवाल आता पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येत आहे.

 

त्यात स्मारक उभारण्यासाठी १ हजार १३५ चौरस मीटर, फुड पार्कसाठी २ हजार २२० मीटर, म्युझिअमसाठी २ हजार ६०० चौरस मीटर तर ३ हजार ६९० चौरस मीटर उघडी जागा असणार आहे. आता यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार असा सवाल सर्व स्तरातून करण्यात येत आहे.औरंगाबादमधील 17 एकरच्या प्रियदर्शिनी उद्यानात झाडं जाळली आणि कापली जातायत...त्यामुळे या वृक्षतोडीबाबत मौन बाळगणाऱ्या शिवसेनेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतायत... ऑक्सिजन हब अशी ओळख असलेल्या या उद्यानात 70 हून जास्त प्रजातींचे पक्षी, 40 प्रकारची फुलपाखरं आणि उंच झाडं आहेत.

WebTittle :  What did Priyadarshan have saved?

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live