VIDEO | शरद पवार आणि मोदींमध्ये चर्चा नेमकी कशावर?

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तब्बल पाऊण तास झालेल्या या भेटीनंतर राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलंय. कसे तर्क वितर्क लढवले गेलेत आणि त्यातून काय निष्पन्न झालं पाहूयात या सविस्तर विश्लेषणातून...

 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तब्बल पाऊण तास झालेल्या या भेटीनंतर राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलंय. कसे तर्क वितर्क लढवले गेलेत आणि त्यातून काय निष्पन्न झालं पाहूयात या सविस्तर विश्लेषणातून...

 

 राज्यातला सत्तापेच कायम असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. तब्बल पाऊण तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्याकडे पवारांनी पंतप्रधानांचं लक्ष वेधलं. 

अवकाळीमुळे झालेलं नुकसान लक्षात घेता शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणीही पवारांनी यावेळी पंतप्रधानांकडे केली. इतकंच नाही तर राज्यपालांनी जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी असल्याचंही पवारांनी मोदींना सांगितलं. या संदर्भात पवारांनी मोदींना एक पत्रही दिलंय. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्यानं तुम्ही तात्काळ मध्यस्थी करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तुम्ही तात्काळ पावलं उचललीत तर मी तुमचा आभारी असेन,” असं पवार यांनी पत्रात म्हटलंय. मात्र असं असलं तरी पवारांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय. मोदी - पवार भेटीमुळे राजकीय तर्कवितर्क सुरु झाले असले तरी शिवसेना मात्र निश्चिंत आहे. राज्यातल्या किंवा देशातल्या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी कुणीही नेता पंतप्रधानांना भेटू शकतो, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. मोदी आणि पवारांच्या भेटीनंतर अमित शहा यांनी तातडीनं मोदींची भेट घेऊन चर्चा केली. पवारांनी मोदींकडे मांडलेले शेतीचे प्रश्न कृषी आणि अर्थ खात्याशी संबंधित होते. या प्रश्नांशी शहा यांच्या खात्याचा थेट संबंध येत नाही. त्यामुळं शहा-मोदींच्या भेटीकडं वेगळ्या नजरेतून पाहिलं जातंय. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे आपसांत सल्लामसलत करूनच महत्त्वाचे राजकीय निर्णय घेतात, असं बोललं जातं. त्यामुळेच  महाराष्ट्रातील पुढील राजकारणाबाबत पवारांनी भाजपपुढं एखादा फॉर्म्युला ठेवला असल्यास त्यावर दोघांमध्ये चर्चा झाली असावी, असा अंदाज बांधला जातोय.

Web Title - what is the main reason of sharad pawar and narendra modi meeting?
 


संबंधित बातम्या

Saam TV Live