भाषेपेक्षा काय बोलता, याला महत्त्व - नागराज मंजुळे

भाषेपेक्षा काय बोलता, याला महत्त्व - नागराज मंजुळे

पुणे - कोणत्या भाषेत बोलता, यापेक्षा काय बोलता, याला महत्त्व असते. इंग्रजी बोलता म्हणून थोर आणि मराठी बोलता म्हणजे हलके, असे काही नसते. इंग्रजी भाषा म्हणजे ज्ञान नाही. भाषा हे माध्यम आहे, आशय नाही. आशयाला महत्त्व दिले पाहिजे. बोलीभाषा बोलणाऱ्याला आपण हिणवतो आणि भाषा वाचविण्याची गोष्ट करतो, याचे विशेष वाटते, असे प्रतिपादन दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले.

जागतिक मराठी अकादमीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कवी रामदास फुटाणे आणि दिग्दर्शक विवेक वाघ यांनी मुलाखत घेतली. त्या वेळी ते बोलत होते. त्यापूर्वी महसूल, पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी विविध कवींच्या तसेच स्वरचित कविता सादर केल्या. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डॉ. पी. डी. पाटील, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, सचिन इटकर, रामदास फुटाणे, डॉ. अशोक विखे पाटील, राजेश पांडे, युवराज शहा, सुनील महाजन आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

सैराट, फॅंड्री चित्रपटा वेळी घडलेले धमाल अनुभव सांगताना मंजुळे म्हणाले, ‘‘तुम्ही शहरात येता तेव्हा वृत्ती, प्रवृत्ती, भाषा घेऊन येता. पुण्यात आलो, त्या वेळी मला शुद्ध बोलता येत नाही म्हणून न्यूनगंड होता. म्हणून चित्रपटाकडे वळलो. त्या वेळी माझी भाषा आणि माझी पात्रे आणण्याचे ठरविले होते.’’

पिस्तुल्या’ शोधण्यासाठी माझ्या गावात, नगरच्या शाळांमध्ये पात्राचा शोध घेतला. ज्या समाजातले पात्र आहे, त्याच समाजातील व्यक्ती निवडली, तर ते भूमिकेला चांगला न्याय देतील, असे वाटले म्हणून नव्या व्यक्ती निवडल्या. विशिष्ट लोकांनीच अभिनय करावा, असे नाही. या वाटाही फोडल्या पाहिजेत, म्हणून माझ्या चित्रपटांसाठी नवे लोक निवडले, असे मंजुळे म्हणाले.

‘झुंड’ चित्रपटाची चर्चा सुरू झाल्यावर अमिताभ आणि माझी भेट झाली. ही भेट अनाकलनीय होती; पण त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच शिकवणारा होता. या चित्रपटात बरेच नवीन कलाकार होते; पण त्यांनी सर्वांना समजून घेतले, असा अनुभव त्यांनी सांगितला.

मराठी समृद्ध करण्यासाठी अनेक पर्यायी शब्द मराठीत आणावे लागतील. शास्र, कृषी क्षेत्रातील अनेक शब्द मराठीत नाहीत. जे इतर भाषेतील शब्द लोक बोलतात, ते आपल्याही शब्दकोशात आणावे लागतील. सामान्य माणसांची, रस्त्यावरील भाषाही मराठीत आली पाहिजे. त्यासाठी शब्द मागवा आणि त्याचा शब्दकोशात समावेश करा, असे मत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.

Web Title What Matters Is More Than Language says Nagraj Manjule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com