VIDEO | कसं असेल राज ठाकरेंचं 'राज'कीय भविष्य...?

साम टीव्ही न्यूज
सोमवार, 2 डिसेंबर 2019

महाराष्ट्रातल्या बदलत्या सत्तासमीकरणांमुळे राज ठाकरेंच्या राजकीय भवितव्याबाबत प्रश्न विचारला जाऊ लागलाय..कसं असेल राज  ठाकरेंचं भवितव्य..पाहूया सविस्तर विश्लेषण...

उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंनी घेतलेली गळाभेट सध्या चांगलीच चर्चेत आहे..ही गळाभेट म्हणजे नव्या राजकीय समीकरणांची नांदी तर नाही ना, अशा चर्चा रंगल्यात.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राजकारण बदलेल काय, असंही बोललं जातंय. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, असा सवाल केला जातोय..मात्र, राजकीय संबंध वेगळे आणि कौटुंबिक संबंध वेगळे असं म्हणत या मुद्द्यात काहीच तथ्य नसल्याचं बोललं जातंय.
महाराष्ट्रातल्या प्रमुख राजकीय पक्षांपैकी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आज सत्तेत आहेत.त्यामुळे सत्तेबाहेर असलेल्या भाजपसोबत जाणं हा मनसेसमोर पर्याय आहे. मात्र, भाजपवर ज्या पद्धतीनं राज ठाकरेंनी टीका केलीय, ते पाहता, भाजपच त्यांना सोबत घेणार का, हा सवाल निर्माण होतो.
मनसेची स्थापना होऊन 13 वर्ष झालीत. 2009मध्ये मनसेला 13, 2014 ला एक आणि 2019 लाही एकच आमदार निवडून आलाय. त्यामुळे विधिमंडळातली मनसेची ताकत नसल्याबरोबरच आहे. असं असलं तरी राज ठाकरेंचा करिश्मा मोठा आहे. उद्धव ठाकरेंप्रमाणे त्यांनाही सत्तेचा सोपान चढायचा असेल तर मेहनत करण्याशिवाय पर्याय नाही. पक्षसंघटनेची बांधणी करावी लागेल. अन्यथा मनसेचं काही खरं नाही, अशीच भावना आज व्यक्त केली जातेय.

Web Title -  What is next Future of raj thkarey?

संबंधित बातम्या

Saam TV Live