VEDIO | नेमकं कसं आहे शिवसेनेचं मिशन गोवा?

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

गोव्यात लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे..महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही भाजपला सत्तेपासून दूर हटवण्यासाठी शिवसेनेनं मोर्चेबांधणी सुरू केलीय.

गोव्यात लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे..महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही भाजपला सत्तेपासून दूर हटवण्यासाठी शिवसेनेनं मोर्चेबांधणी सुरू केलीय.

महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री देण्याचं मिशन फत्ते केल्यानंतर आता शिवसेनेनं आपली मुलूखमैदानी तोफ गोव्याकडे वळवलीय. महाराष्ट्रातील दिग्विजयाचे मुख्य शिलेदार संजय राऊत हेच आता गोव्यातल्या भाजपच्या सरकारचा पाडाव करण्यासाठी चालून जात आहेत.
गोव्यात विरोधात असलेल्या गोवा फॉरवर्डच्या तीन आमदारांनी संजय राऊत यांची भेट घेतल्यानं गोव्यात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आलाय.
गोव्यातलं भाजपचं सरकार अनैतिक पायावर आधारलेलं असल्याच्या आरोपाची तोफ त्यांनी डागलीय आणि भाजपच्या गोटात खळबळ उडवून दिली. गोव्यात भाजपनं सरकार स्थापन करताना मोठ्या प्रमाणावर राजकीय तोडफोड केली होती. गोव्याच्या विधानसभेत एकूण ४० आमदार आहेत.. भाजपकडे २७, कॉंग्रेसकडे ५, गोवा फॉरवर्ड पक्षाकडे ३, अपक्षांकडे ३, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडे १, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे१ असं संख्याबळ आहे. त्यात सरकारसोबत दोन अपक्ष, मगोपा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रत्येकी आमदार आहे. त्यामुळे सरकारच्या बाजूने सध्याच्या घडीला ४० पैकी ३१ आमदार आहेत. 
प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालच्या गोवा सरकारमध्ये मूळ काँग्रेसचे 13 आमदार आहेत..मात्र, अन्य काही जणांना घेऊन ते फुटण्याच्या  तयारीत असल्याचं बोललं जातंय..ते फुटल्यास भाजप सरकारचं संख्याबळ 18च्या म्हणजेच बहुमताच्या खाली येतं.
त्या पार्श्वभूमीवर हे आमदार फुटले तर गोव्यातही भाजप सरकार उलथेल..आता संजय राऊतांच्या तोफखान्यासमोर भाजपचे चाणक्य कसे टिकाव धरतात, हे पाहणं रोचक ठरेल.

WEB TITLE - WHAT IS SHIVSENA'S MISSION GOA?


संबंधित बातम्या

Saam TV Live