VIDEO | 1 सप्टेंबरपासून अनलॉक-4 मध्ये काय सुरु आणि काय बंद?

साम टीव्ही
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

केंद्र सरकारनं शाळा कॉलेज उघडण्याचा निर्णय राज्य सरकारवर सोपवल्याची माहिती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली मेट्रो ट्रेन पुन्हा एकदा धावण्याची शक्यता आहे. अनलॉक-4 मध्ये केंद्र सरकार मेट्रोबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

मात्र, कोरोनाची देशातील परिस्थिती पाहून यावर अखेरचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्याशिवाय, केंद्र सरकार थिएटर आणि बार उघडण्याबाबतही निर्णय घेण्याची शक्यता आहे. मात्र शाळा-कॉलेज उघडण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही.

केंद्र सरकारनं शाळा कॉलेज उघडण्याचा निर्णय राज्य सरकारवर सोपवल्याची माहिती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जनजीवन आणि देशातील आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू अनलॉकची प्रक्रिया राबवली जातीय. आता जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी 1 सप्टेंबरपासून देशात अनलॉक 4 सुरु होणार आहे.

पाहा, अनलॉक-4 मध्ये काय सुरु आणि काय बंद?
 


संबंधित बातम्या

Saam TV Live