8 जूननंतर काय बदलणार? प्रवास परवानगी, अंतिम वर्षाच्या परिक्षा वाचा सविस्तर माहिती...

साम टीव्ही
गुरुवार, 4 जून 2020

जे विद्यार्थी अंतिम वर्षात आहेत, त्यांना परीक्षा द्यावी लागण्याची शक्यता आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत राज्यपालांनी दिलेल्या पत्रामुळे विद्यापीठांनी परीक्षा रद्द करण्यासंबंधीची प्रक्रिया थांबवलीय.

मुंबई महानगर क्षेत्र म्हणजेच MMR रिजनमध्ये आता कोणत्याही प्रतिबंधाशिवाय विना पास प्रवास करण्यास राज्य सरकारने मुभा दिलीय. राज्य सरकारने मिशन बिगेन अगेनच्या नियमांत काही बदल केलेत.

नव्या नियमांनुसार खासगी कार्यालयांतही दहा टक्के किंवा दहा कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल तेवढे कर्मचारी उपस्थित ठेवून 8 जूनपासून खासगी कार्यालयं सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलीय. त्याचबरोबर 7 जूनपासून वृत्तपत्रांची छपाई आणि वितरणालाही परवानगी देण्यात आलीय. तसंच विद्यापीठे, कॉलेज आणि शाळांमधील शिक्षणेतर कामांना परवानगी देण्यात आलीय. 

दरम्यान,  'कोरोना कुठल्याही ऋतूत पसरू शकतो, त्यामुळं मास्क आणि सॅनिटाय़झर वापरण गरजेचं असल्याचं मत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केलंय. पावसाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल असे अनेक मेसेज सध्या सोशल मीडियावर फिरताहेत. त्याला टोपेंनी उत्तर दिलंय..पावसाळ्यातही कोरोनाचा धोका आहे, त्यामुळं लोकांनी सोशल डिस्टंसिंग पाळून मास्कचा वापर करावा अशी माहिती टोपेंनी दिलीय.

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचं काय?

जे विद्यार्थी अंतिम वर्षात आहेत, त्यांना परीक्षा द्यावी लागण्याची शक्यता आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत राज्यपालांनी दिलेल्या पत्रामुळे विद्यापीठांनी परीक्षा रद्द करण्यासंबंधीची प्रक्रिया थांबवलीय. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून त्यांना ग्रेड देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विरोध केला. त्यानंतर परीक्षेचा निर्णय कायद्यातील तरतूदी पाहून घेऊ, असं पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं. त्यामुळे परीक्षेचा पेच निर्माण झाला असून विद्यापीठांनी परीक्षा रद्द करण्यासंबंधीची सारी प्रक्रिया थांबवलीय. त्याबाबतचे अंतिम परिपत्रक आल्यानंतर त्यानुसार प्रक्रिया पार पाडली जाईल.


संबंधित बातम्या

Saam TV Live