मुंबईच्या लॉकडाऊनचं काय होणार? काय निर्णय घेतील मुख्यमंत्री

मुंबईच्या लॉकडाऊनचं काय होणार? काय निर्णय घेतील मुख्यमंत्री

मुंबई : महामुंबईच्या हद्दीत 1 ते 15 मे या काळात कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव रहाण्याची शक्‍यता असून त्यावर उपाययोजना म्हणून झोपडीभागातील रहिवाशांना कोरडा शिधा देण्याबरोबरच वैदयकीय सेवा पुरवण्याची योजना काल केंद्र सरकारने पाठवलेल्या चमूसमोर सादर करण्यात आली आहे. मुंबई पालिकचे आयुक्‍त प्रवीणसिंह परदेशी यांनी बाधितांना घरच्या घरातच विजनवासात ठेवण्याच्या योजनेबरोबरच कोवीड रूग्णांसाठी उभारल्या जाणाऱ्या व्यवस्थांची सर्वकष माहिती दिली. 

मुंबईत होणारा संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेता मे महिन्याचे दोन आठवडे लॉकडाउन वाढवणार काय हा निर्णय मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर सोपवला जाईल, असे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईत बाधीत रूग्णांचे विलगीकरण मोठया प्रमाणावर करण्यात येणारआहे.तसेच ज्या व्यक्तीमुळे संसर्ग झाला त्याची पार्श्वभूमी लक्षात घेत उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती या पथकाला सांगण्यात आली. केंद्राच्या सेवेत असलेले अतिरिक्‍त सचिव मनोज जोशी यांच्या अध्यक्षतेखालील पाच अधिकाऱ्यांच्या पथकाने आज महापालिकेतर्फे सुरू असलेल्या उपाययोजना समजून घेतल्या.

या पथकातील काही अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांची भेट घेवून मुंबईत चाचण्यांची संख्या कमी असेल तर भलतेच घडेल,  बाधितांची संख्या हजाराचा आकडा ओलांडू शकेल, अशी माहिती दिल्याचे सांगण्यात येते आहे मात्र रात्री उशीरापर्यंत या बातमीला दुजोरा मिळू शकला नाही.

कन्टेनमेंटमधील कुटुंबांना शिधा

आज मुंबईतील बाधित भागांचा विशेषत: वरळी, धारावी, अंधेरी या ठिकाणचा आढावा देण्यात आला. संसर्गाची भीती तर आहेच ,पण कन्टेनमेंटमध्ये अडकलेल्या रूग्णांना त्रास होवू नये, यासाठी त्यांच्या कुटुंबांना शिधा देण्यात येईल, अशी माहिती मुंबई पालिकेचे आयुक्‍त प्रवीणसिंह परदेशी यांनी पथकासमोर सादर केल्याचे सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com