VIDEO | खोटे मेसेज ओळखण्यासाठी हे पाहा; गुगलचं नवीन फिचर

माधव सावरगावे
रविवार, 15 डिसेंबर 2019

तुम्हाला खोटे मेसेज येतायत का...? बनावट मेसेजमुळं तुमची फसवणूक झालीय का...? पण,आता खोटा मेसेज तुम्हाला आला तर तुम्हीच त्या मेसेजची सत्यता जाणून घेऊ शकता...मात्र, हे कसं काय शक्य आहे ते तुम्हीच पाहा...

तुम्हाला खोटे मेसेज येतायत का...? बनावट मेसेजमुळं तुमची फसवणूक झालीय का...? पण,आता खोटा मेसेज तुम्हाला आला तर तुम्हीच त्या मेसेजची सत्यता जाणून घेऊ शकता...मात्र, हे कसं काय शक्य आहे ते तुम्हीच पाहा...

तुमच्या मोबाईलमध्ये आता बनावट मेसेज आला तर काळजी करायची गरज नाही. खोट्या मेसेजपासून फसवणूक होणार नाही. कारण, तुम्हीच आता मोबाईलमध्ये आलेला मेसेज खरा आहे की खोटा ते ओळखू शकता. खोटा मेसेज शोधण्यासाठी गुगलनं व्हेरिफाईड मेसेज नावाचं फिचर भारतासह अनेक देशांमध्ये सुरू केलंय.
खोटा मेसेज ओळखायचा असेल तर तुमच्याकडे यासाठी एंड्रायड स्मार्टफोन असायला हवा. मोबाईलवर वारंवार खोटे मेसेज येत असतात. नको नको ते मेसेज पाहून आपण हैराण होतो. कधी कधी तर लिंकही पाठवून लोकांची फसवणूक केली जाते. त्यामुळं या सगळ्या त्रासापासून सुटकारा मिळू शकतो. पण, नक्की काय याचा फायदा होऊ शकतो याबद्दल अधिक माहिती सायबर एक्सपर्टकडून घेतली.

व्हेरिफाईड मेसेजचं फिचर भारतासह अमेरिका,मॅक्सिको,ब्राझील, ब्रिटेन,फ्रान्स,स्पेन आणि कॅनडासारख्या देशांमध्ये सुरू होणार आहे.
मेसेज पाहण्यासोबतच बनावट वेबसाईट्सही बनवण्यात आल्यायत.त्यामुळं बनावट वेबसाईट्सही ओळखू शकता.
सध्या तरी काही व्यावसायिक कामांसाठी व्हेरिफाईड मेसेजसाठी सेवा सुरू केलीय...गुगल पे आणि गुगलचे व्हेरिफिकेशन कोड्स व्हेरिफाईड मेसेजसाठी एनरॉल करण्यात आलाय.जर खोटा मेसेज आला तर गुगल तुम्हाला हा मेसेज खोटा आहे असं अलर्ट करेल .त्यामुळं जर एखादा मेसेज आला तर तुम्हीही मेसेज खोटा आहे की खरा याची पडताळणी करू शकता.

Web Title -  whats ap's new feature of know fake masseges


संबंधित बातम्या

Saam TV Live