व्हॉट्सअॅप ग्रुपवरील चॅटींगच्या वादातून डायरेक्ट खूनच केला

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

व्हॉट्सऍप चॅटच्या वादातून खून झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली आहे. 

टोळक्यानं हर्सूलमध्ये तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याचं समोर आलंय. या घटनेनं औरंगाबादेत एकच खळबळ उडालीये. व्हॉट्सऍप ग्रूपवर सुरु असलेल्या चॅटमध्ये वाद झाला.

हा वाद इतका विकोपाला गेला की यामध्ये एका तरुणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीये. मोईन मेहमूद पठाण असं हत्या करण्यात आलेल्या इसमाचं नाव आहे.

भररस्त्यात हा प्रकार सुरु होता. रक्ताच्या थारोळ्यात दोघांना तसंच टाकून गुंड शांतपणे निघून गेले. दरम्यान, बऱ्याच वेळानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या या संपूर्ण घटनेचा पोलिस तपास करतायेत. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live