तुम्ही तुमचं व्हॉट्सऍप अपडेट केलं नसेल तर नक्की करा, नाहीतर...

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 14 मे 2019

सॅनफ्रान्सिस्को : सोशल मीडियातील प्रसिद्ध नेटवर्किंग कंपनी 'व्हॉट्सअप'ने वापरकर्त्यांना (युजर्स) आपले ऍप अपडेट करण्यास सांगितले आहे. व्हॉट्सऍपच्या 'ऑडिओ फोन कॉल' माध्यमातून एक व्हायरस कार्यरत झाला आहे. त्याचा खासगी माहितीवर परिणाम होऊ शकतो. याशिवाय, फोनच्या वापरावर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. 

हा व्हायरस इस्त्राईली सायबर इंटेलिजन्स कंपनी 'एनएसओ'कडून तयार केला गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, कंपनीने व्हायरसच्या दुरुपयोगाबद्दलचा दावा फेटाळला आहे. एनएसओचे तंत्रज्ञान हे गुप्तचर व कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांसाठी करण्यात येते. 

या व्हायरसवर संपूर्ण नियंत्रण आणले असल्याचे फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सऍपने स्पष्ट केले आहे. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून व्हॉट्सऍप अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सद्यस्थितीत जगभरात व्हॉट्सऍपचे 150 कोटी युजर्स आहेत.

Web Title: WhatsApp wants users to upgrade app urgently

संबंधित बातम्या

Saam TV Live