VIDEO | खातेवाटपाचा तिढा सुटणार कधी?

VIDEO | खातेवाटपाचा तिढा सुटणार कधी?

मुंबई : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन आता बरेच दिवस होत आलेत. मात्र अजुनही खातेवाटपाचा तिढा काही सुटलेला दिसत नाहीये. खातेवाटपाबात धनंजय मुंडे, विजय वड्डेट्टीवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झालीय. या बैठकीमध्ये खातेपाटपासोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा झाल्याचं कळतंय. मात्र खातेवाटपाबाबत राष्ट्रवादी आणि शिवसेनेशी बोलणं अजूनही पूर्ण झालेली नाही, अशी माहिती काँग्रेसच्या गोटातून मिळतेय.

दरम्यान राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार आता नागपुरात होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. अधिवेशन काळातच नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं समजतंय. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याने मंत्रिमंडळाचे रखडलेले खातेवाटप अजून किमान दोन दिवस तरी होणार नाही, असं सूत्रांनी सांगितलंय. 

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन नऊ दिवस झाले, त्यांच्यासह सहा मंत्र्यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादी, काँगेे्रस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांचा यात समावेश आहे. मात्र, हे मंत्री अजूनही बिनखात्याचे आहेत. 

या पदांसाठी वाद

राष्ट्रवादी आणि काँगेे्रस यांच्यातील खात्यांची रस्सीखेच अजून संपलेली नाही. हा विलंब होत असल्याचं सांगण्यात येतंय. गृह आणि महसूल या खात्यांवरून मुख्यतः वाद असून, नगरविकास मात्र शिवसेनेकडेच राहील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सामान्य प्रशासन खातं स्वतःकडे ठेवतील. गृह खातं त्यांनी सांभाळावं, असा आग्रह शिवसेनेतूनच होत असला, तरी उद्धव ठाकरे त्यासाठी तयार नाहीत. नगरविकास खाते सुभाष देसाई यांच्याकडे तर एकनाथ शिंदे यांना सार्वजनिक आरोग्यासह आणखी एक महत्त्वाचे खाते दिले जाईल. 

उपमुख्यमंत्री कोण होणार?

उपमुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत जयंत पाटील आणि अजित पवार हे दोन दावेदार असले, तरी शरद पवार हे आपले वजन कोणाच्या पारड्यात टाकणार, याबद्दल उत्सुकता आहे.  त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदाबाबत अजुनही संभ्रमच आहे.

Web Title -  When Cabinet expansion solve?

.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com