VIDEO | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीतच राहणार की वर्षावर?

साम टीव्ही न्यूज
सोमवार, 2 डिसेंबर 2019

महाराष्ट्राच्या राजकारणाचा रिमोट कंट्रोल जिकडे इतकी वर्ष होता. ते घर म्हणजे मातोश्री. ठाकरेंचं घर. पण आता ठाकरे मुख्यमंत्री झालेत. त्यामुळे चर्चा रंगलीय. ती म्हणजे, मुख्यमंत्री ठाकरे राहणार कुठे? वर्षा? की मातोश्री? अजून एक नवा पर्याय सुद्धा आहेच.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा रिमोट कंट्रोल जिकडे इतकी वर्ष होता. ते घर म्हणजे मातोश्री. ठाकरेंचं घर. पण आता ठाकरे मुख्यमंत्री झालेत. त्यामुळे चर्चा रंगलीय. ती म्हणजे, मुख्यमंत्री ठाकरे राहणार कुठे? वर्षा? की मातोश्री? अजून एक नवा पर्याय सुद्धा आहेच.

उद्धव ठाकरेंसमोर सध्या एक वेगळाच पेच आहे. हा पेच आहे. राहायचं कुठे? मातोश्रीवर? मातोश्री  दोनवर? की वर्षावर? मुख्यमंत्री झाल्यापासून पत्रकार सतत त्यांना हे प्रश्न विचारतायत. मात्र ठाकरेंची उत्तरं तळ्यात मळ्यात मनस्थिती दर्शवणारीच आहेत.
मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरेंसमोर असलेले हे तीन पर्याय बघा. पहिला पर्याय आहे, अर्थात मातोश्रीचाच.

 • ठाकरेंचं पहिलं प्रेम 'मातोश्री'
 • बाळासाहेबांनी 70च्या दशकात मातोश्री बांधलं
 • वांद्र्याच्या कलानगरमध्ये ही तीन मजली इमारत आहे
 • गेली 40 वर्ष राज्याच्या राजकारणात मातोश्री रिमोट कंट्रोल ठरलंय
 • आजवर देशातील अनेक दिग्गजांनी इथे हजेरी लावलीए 
 • तर मुख्यमंत्री ठाकरेंसमोरचा दुसरा पर्याय आहे वर्षा बंगल्याचा
 •  मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला 
 • 1963 सालापासून वर्षा बंगला मुख्यमंत्र्यांचा बंगला झाला
 • मलबार हिल परिसरात हा बंगला आहे
 • सुमारे 12 हजार स्केअर फूटमध्ये हा बंगला बांधण्यात आलाय
 • या मध्ये पाहुण्यांना बसण्यासाठी विशेष हॉल
 • बैठकीसाठी अतिरिक्त परिसर सुद्धा आहे
 • आजवर राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या अनेकांचं वास्तव्य इथे राहिलंय 
 • या शिवाय ठाकरेंकडे एक वेगळा पर्याय सुद्धा आहे. ज्याचं काम सध्या अंतिम टप्प्यात आलंय.. 
 • मातोश्री-2 हे मातोश्रीच्या अगदी समोरच बांदण्यात आलंय
 • 10 हजार स्वेअर फूटमध्ये हा बंगला आहे
 • इमारतीत 3 ड्युप्लेक्स फ्लॅट
 • 5 बेडरूम, एका स्टडी रूमचा समावेश आहे
 •  
 • होम थिएटरसह स्विमिंग पूलची सुविधा आहे 
 • मोठी जीम आणि एक छोटे सभागृह आहे

सत्ता आली. की ती आपल्यासोबत बरंच काही घेऊन येते. आणि गेली की बरंच काही घेऊनही जाते. एकीकडे वर्षा सोडल्यानंतर फडणवीस मुंबईत घर शोधत असल्याची चर्चा आहे.. तर दुसरीकडे मुख्यमंत्री झालेल्या ठाकरेंकडे राहण्यासाठी तीन-तीन पर्याय आहेत. आता मातोश्रीवर राहून ठाकरे प्रेम निभावतात. की वर्षावर राहून जबाबदारी.. याची उत्सुकता मोठी आहे.

Web Title - Where will be udhav thakarey live?


संबंधित बातम्या

Saam TV Live