(Video) -  व्हाईटनरची नशा ग्रामीण भागात 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

आतापर्यंत आपण चरस, अफू, गांजा या नशा आणणऱ्या अंमली पदार्थांबाबत ऐकलं असेल पण आता यात व्हाईटनरचीही भर पडलीय. विशेष म्हणजे कोवळी मुलं या नशेच्या आहारी जातायेत. अकोट शहरात हा धक्कादायक प्रकार उघड झालाय.

आईकडून नोटबुकसाठी पैसे घेऊन निघालेला मुलगा घरी परतलाच नाही. चिंतेत सापडलेल्या पालकांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी तपास केला असता हा मुलगा व्हाईटनरच्या विळख्यात सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 

व्हाईटनरची नशा करणाऱ्या या मुलांचं वय जेमतेम 12 ते 15 वर्ष आहे. ज्या वयात मुलांवर संस्कार केले जातात. मातीला आकार द्यावा तसं मुलांना घडवलं जातं. त्याच वयात ही कोवळी मनं अशा व्यसनांच्या आहारी जाणं निश्चितच धोकादायक आहे. 

मुलांना अशा वाईट मार्गावर जाण्यापासून रोखायचं असेल तर पहिली जबाबदारी पालकांची आहे. आपला मुलगा कुणासोबत राहतो, काय करतो याची माहिती ठेवा. त्याच्या हाती अनाठायी पैसे देऊ नका. वेळोवेळी मुलांच्या प्रत्येक कृतीकडे काळीजीपूर्वक लक्ष द्या. अन्यथा तुमचं दुर्लक्षच तुमच्या मुलाच्या जीवावर उठू शकतं. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live