भारत आणि चीनमध्ये कोण आहे कुणाला वरचढ?

साम टीव्ही
शुक्रवार, 29 मे 2020
 • भारत आणि चीनचं युद्ध सामर्थ्य नेमकं किती?
 • भारत आणि चीनमध्ये कोण आहे कुणाला वरचढ?
 • चीन-भारत लढाई झाल्यास कोण होणार विजयी?

 

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये विस्तवही जात नाहीय. हा तणाव इतका वाढलाय की, भारत आणि चीनचं युद्ध होतंय की काय, असं चित्र निर्माण झालंय. मात्र हे युद्ध झालंच तर भारत चीनचं थोबाड कसं फोडू शकतो.

गेल्या काही दिवसांत युद्धखोर चिनी ड्रॅगन भारताविरोधात जास्तच वळवळताना दिसतोय. त्यामुळे भारत आणि चीनमध्ये लढाई होतेय की काय असं चित्र निर्माण झालंय. आशिया खंडातील दोन महासत्ता असलेल्या भारत आणि चीनमध्ये जर लढाई झाली तर कोण कुणाची जिरवेल हे पाहण्यासाठी दोन्ही देशांचं सामर्थ्य बघावं लागेल.

 भारत आणि चीन... कोण कुणाला वरचढ?
 सैन्यदल

 • भारताच्या  सज्ज आणि अतिरिक्त जवानांची संख्या 35 लाख 44 हजार, तर चीनकडे 26 लाख 93 हजार सैनिक आहेत. 
 • सब हेडर- लढाऊ विमान
 • भारताकडे 538 लढाऊ विमानं आहेत तर चीनकडे 1232 लढाऊ विमानं आहेत.
 • सब हेडर- लढाऊ टँक
 • भारताकडे 4292 लढाऊ टँक आहेत तर चीनकडे असलेल्या लढाऊ टँकची संख्या 3500 आहे.
 • काही बाबतीत चीन भारतापेक्षा वरचढ असला तरी भारतही चीनपेक्षा काही कमी नाहीय. चीनला जशास तसं उत्तर देण्याएवढं सामर्थ्य भारताकडेही आहे. कारण चीनकडे हवेतच इंधन भरू शकेल असं एकही विमान नाहीय. मात्र भारताकडे अशा विमानांची पुरेपूर सज्जता आहे. त्यामुळे चीनच्या विमानांनी उड्डाण घेतल्यावर काही काळातच ती माना टाकतील. त्यामुळे युद्धखोर चीननं भारताचा नाद केलाच, तर भारत चीनचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही.
   


संबंधित बातम्या

Saam TV Live