प्रवासात गाडी लागते आणि उलटी होते? काय आहे कारणं आणि उपाय वाचा...

MARATHI NEWS why do we vomit while traveling?
MARATHI NEWS why do we vomit while traveling?

असं काय होतं गाडीत बसल्यावर की आपल्याला उल्टी होते? 

उल्टी होते म्हणजे खाल्लेलं वर येतं. तुम्ही म्हणाल गाडी हलत असते त्यामुळे शरीरातलं अन्न ढवळून निघतं. आणि ते वर येऊन उल्टी होते. तुम्ही 'हे' लॉजिक लावलं असेल तर तुम्ही शंभर टक्के चुकलेला आहात! 

“मोशन सिकनेस” या शब्दाचं नाव तुम्ही ऐकलं असेलच.. . मोशन म्हणजे हालचाल आणि सिकनेस म्हणजे आजारपण. ह्याचाच अर्थ हालचाली मुळे येणारं आजारपण. हे आपल्याला विमान प्रवास, बोटीचा प्रवास आणि गाडीच्या प्रवासात येऊ शकतं.

मोशन सिकनेस येतो कसा?

ह्याचं उत्तर आहे डोळे आणि कानांचा नं जमलेला ताळमेळ. ज्याला काँफ्लिटिंग सिग्नल्स थेअरी असंही म्हणतात. आता तुम्ही विचाराल डोळे आणि कानांचा कसला ताळमेळ? तर.. गाडी सुरु झाल्या नंतर तुम्ही आरामात पाठ टेकून बसलेला असता. तुमचे डोळे गाडीच्या आतमध्ये असलेल्या सर्व गोष्टी बघत असतात.. अगदी ड्राइवरच्या सीट पासून ते बाजूला बसलेल्या माणसापार्यंत. गाडी तर चालू असते पण गाडीतल्या वस्तूंची मुव्हमेंट नसते. पण त्याच वेळी आपले कान सर्व काही ऐकत असतात. गाड्यांचा मागे जाणारा आवाज, हॉर्न आणि बरंच काही आपले कान ऐकत असतात.. आणि मेंदू कडे सिग्नल्स पाठवत असतात. त्याच वेळी डोळे सुद्धा आपली माहिती, मेंदू कडे पाठवण्याचं काम करतात. आणि मग मेंदू 'गोंधळात' पडतो.

आपला मेंदू माहिती गोळा करत असतो. प्रवास करताना डोळे आणि कान वेगवेगळी माहिती देतात. डोळे म्हणतात हालचाल नाहीये. तर कान म्हणतात हालचाल आहे. ह्या दोघांचे सिग्नल बघून मेंदू कनफ्यूज होतो. आणि मग होते उलटी. पण आता प्रश्न असे आहेत की कानाला हालचाल झालीये हे कसं समजतं? आणि वेगवेगळे सिग्नल्स मिळाल्या नंतर मेंदू उलटी का करायला सांगतो?

कानाच्या आतल्या बाजूला एक व्हेस्क्युलर सिस्टिम असते. म्हणजे या सिस्टिमच्या एका भागात लिक्विड असतं आणि दुसऱ्या भागात थोडेसे केस असतात. जेव्हा हालचाल होते तेव्हा लिक्विड हलतं आणि केसांवर आदळून केसांची पण हालचाल होते. ह्या वरून मेंदू ला हालचाल होत असल्याचं समजत.


पण मग उलटी का होते?

याचं कारण आहे न्युरो टॉक्सिन्स. न्युरो टॉक्सिन म्हणजे एक प्रकारचं विष.. जे खाण्या पिण्यात असतं. मेंदूला जेव्हा शरीरात न्युरो टॉक्सिन्स प्रवेश झाल्याचे संकेत मिळतात तेव्हा मेंदूला वाटतं की शरीरात पॉईजनची एन्ट्री झालीये... मेंदूला हे समजताच.. 'लगेचच' शरीरात सूचनांचा सिग्नल जातो. पोटातलं सगळं बाहेर काढण्यासाठी प्रक्रिया मेंदूद्वारे सुरु होते... आणि तोंडाला लाळ सुटून उलटी होणार आहे, याचे SYMPTOMS दिसून येतात.  पण हे सगळं टाळता येऊ शकतं का? तर उत्तर आहे 'हो'... हे टाळता येऊ शकतं.

प्रवासात हे टाळण्यासाठी शक्य तितक्या लांब पाहण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच खिडकीतून बाहेर बघा.
कदाचित तुम्हाला फरक जाणवेल.

Web Title - MARATHI NEWS why do we vomit while traveling?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com