सावधान! वाचा नाश्त्याला मिसळ, समोसा, वडा खाणं का आहे डेंजर?

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 11 मार्च 2020

रोज वेगवेगळा ब्रेकफास्ट काय करायचा, असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. पण अनेकजण सकाळच्या नाशत्याला मिसळ पाव, साबुदाणा वडा , समोसा किंवा समोसा पाव सारखे पदार्थ खातात. पण असे पदार्थ सकाळी नाशत्यामध्ये खाल्ल्यास तुमचा अख्खा दिवस खराब होऊ शकतो. तुमच्या ब्रेकफास्टवर तुमच्या पुढच्या दिवसाचा मूड डिपेन्ड करतो.. त्यामुळे तुम्ही नेमकं नाश्त्यामध्ये खात असलेल्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक तर ठरत नाहीत ना.. ते बघुया.

सकाळी ऑफिसला किंवा कुठेही कामासाठी बाहेर निघताना चांगला नाश्ता करावा. नाश्ता केल्यानं शरीर संतुलित राहतं, असा सल्ला दिला जातो.  हा सल्ला योग्यचं आहे. पण नाश्त्यामध्ये नेमकं काय खावं हे कुणीच सांगत नाही. त्यामुळे सकाळी जे काही समोर येईल ते आपण खाऊन मोकळे होतो.

 

आज अशाच काही पदार्थांबद्दल बोलणार आहोत, जे तुम्ही सर्रासपणे नाश्त्यामध्ये खात असाल.. 
पण तुमच्या नकळत त्या पदार्थांचा तुमच्या शरीरावर परिणाम व्हायला सुरुवात झालेली असू शकते...
कोणते आहेत असे नाश्त्यातले धोकादायक पदार्थ आणि त्यांचे काय आहे SYMPTOMS पाहा...

 यातला पहिला पदार्थ. प्रत्येकाचा अवडता. आणि नाश्त्यासाठी निवडला जाणारा सगळ्यात पहिला पर्याय. तो म्हणजे मिसळ पाव. अनेकदा तुम्ही नाशत्याला मिसळ पाव खात असालंच. मिसळवरची तर्री इतकी भारी लागते की असा नाश्ता तुम्ही नाकारू शकत नाही. 
मात्र मिसळ पाव नाश्त्याला खाणं ही काही चांगली गोष्ट नाही. याचं कारण म्हणजे नाश्त्याला मिसळ पाव खाल्यानं शरीरातलं पौष्टिक मूल्य, कमी होतं, आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. पावातून कॅन्सरजन्य घटक शरीरात जात असल्याचं समोर आलंय.  काही दिवसांपूर्वीच या संदर्भात एक अहवाल समोर आला होता. यात मैद्याने बनलेला पाव किंवा ब्रेड खाण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं होतं. त्यामुळे ब्रेड खाणं शक्यतो टाळा. 
मिसळ पावनंतर सर्रास खाल्ला जाणारा नाश्त्यातला पदार्थ म्हणजे समोसा.
सामोसा हा तर खूपंच घातक पदार्थ आहे. नाश्त्याला समोसा तुम्ही रोज खात असाल, तर लगेच सोडून द्या... मैद्यापासून बनलेला, बटाट्याचं mixture  असलेला, तळलेला सामोसा खाल्लात तर तुमची सकाळ आणि अख्खा दिवस खराब होतो. समोस्याने तुमचं पोट भरत असेल.. तर तुमचं शरीर कायमस्वरुपी अनहेल्दी होतंय. हे ध्यानात असू द्या.

बटाटा आणि मैद्याचा पाव असलेल्या वडापावमध्ये तर जवळपास दोनशे- श्याह्यांशी कॅलरीज असतात. त्यामुळे सकाळी नाश्त्याला वडापाव खाताना एकदा नाही तर किमान दोनदा तरी विचार करा.

सकाळच्या वेळेत बटाट्याचे सेवन शक्यतो करु नका. तसंच तेलकट पुरी आणि बटाट्याच्या भाजीचं कॉम्बिनेशन देखील तितकंसं चांगलं नाही. त्यामुळे पुरी आणि बटाट्याच्या भाजी देखील नाश्त्यासाठी avoid करा. 

तेलकट आणि बटाटा असं सगळं नाश्त्याला नको.. म्हणून तुम्ही साऊथ इंडिअन नाश्ता करण्याचा विचार करत असाल.. तर जरा थांबा.. इडली मेदूवडा हा देखील अनेकांचा आवडीचा नाश्ता.. त्यात मेधूवडा सांबार सगळ्यांचीच फेवरेट डीश. 
पण मेधू वडा अंबवलेला असतो आणि पचायला जड असतो, हे तुम्हाला माहिती आहे का?. 
आंबावलेल्या पदार्थांमध्ये 'यीस्ट' नावाचा पदार्थ घालतात. जो शरीरासाठी अत्यंत घातक असतो. असे आंबवलेले पदार्थ खाल्ल्यावर skin allergy आणि पोटाचे विकार होण्याची  दाट शक्यता असते. त्यामुळे मेधू वडा खायचा असेलंच तर दुपारच्या जेवणात खा.. नाश्त्याला शक्यतो मेदू वडा खाणं टाळा.. 
उपवासाच्या दिवशी नाश्त्याला साबुदाणा खिचडी ठरलेली असते. साबुदाणा खिचडी नसेल.. तर प्रत्येकाची पहिली पसंती असते ती साबुदाणा वड्याला. उपवासही होतो आणि चमचमीत खाण्याची हौसही भागते. मात्र बटाटा, साबुदाणा, कॉर्नस्टार्च आणि तेल असे सगळे पदार्थ मिळून तयार झालेला साबुदाणा वडा नाश्त्यासाठी अतिशय धोकादायक असतो. 
कारण या पदार्थाने पित्त किंवा acidity होण्याची शक्यता जास्त असते.. त्यामुळे साबूदाणा किंवा शेंगदाणे खाणं टाळावं. त्या ऐवजी तुम्ही वरीचे तांदूळ, राजगीरा किंवा फळं खाणं केव्हाही चांगलं. 

सध्या cereal फूडच्या advertisements आपण बऱ्याचदा पाहतो. Cereal food म्हणजे cornflakes, chocos किंवा oats असं packed food चा नाश्ता केला तर तुम्ही 'हेल्थी' ब्रेकफास्ट केला असं या advertisements मध्ये सांगण्यात येतं. मात्र हा तुमचा मोठा गैरसमज आहे. अशा गोष्टी आकर्षक वाटत असल्या तरी त्यांचा उपयोग शून्य असतो. त्यामुळे अशा जाहिरातींच्या आहारी जाऊ नका..

आता तुम्ही म्हणाल खाण्यासरखं उरलं तरी काय? तर अंडी, दही, फळं, सुकामेवा, खजूर यांसारखे पौष्टिक पदार्थ नाश्त्यासाठी खाणं उत्तम!

नियमित पोळी भाजी किंवा पोहे, उपमा असा नाश्ता केल्यास अपाय अजिबात होत नाही.. उलट त्याने फायदाच होतो. 

Web Title - marathi news why fast food and street food is very harmful for health?


संबंधित बातम्या

Saam TV Live