मौजमजा करण्यासाठी गोवा नको; दादर चौपाटीवर या!

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 25 फेब्रुवारी 2019

मुंबई - समुद्रकिनारी मौजमजा करायची असल्यास गोवा किंवा सेशेल्सला कशाला जायचे? आपण आपली दादर चौपाटी स्वच्छ व सुंदर करून तिथे धमालमस्ती करू शकतो... दादर चौपाटी स्वच्छ करण्यासाठी १०० आठवडे धडपडणाऱ्या जय शृंगारपुरे यांनी आपल्या कृतीतून हे प्रत्यक्षात आणण्याचा विडा उचलला आहे. रविवारी (ता. २४) दुपारी त्यासाठी दादर चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

किनाऱ्यावर येणारे प्लास्टिक पिशव्यांचे डोंगर पाहून शृंगारपुरे अस्वस्थ झाले. ही स्थिती बदलण्याचा आपणच प्रयत्न करूया, असा निर्धार करून त्यांनी आपल्या जय फाऊंडेशन व अन्य काही स्वयंसेवी संस्था, मित्र आणि परिचितांच्या मदतीने चौपाटी स्वच्छ करण्यास सुरुवात केली. 

स्वच्छता उपक्रमात नागरिक आणि शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही मदत केली. चित्रपट कलाकारांबरोबरच इतर क्षेत्रांतील सेलिब्रिटींनी सहभागी होऊन उत्साह वाढवला. जय फाऊंडेशनची स्वच्छता मोहीम आज १०० आठवड्यांची झाली. त्यानिमित्त दादर चौपाटी स्वच्छ करण्याबरोबरच धमालमस्ती झाली. दादर चौपाटीवरही मौजमजाहोऊ शकते. त्यासाठी आपण आपला समुद्रकिनारा स्वच्छ ठेवूया, असा संदेश आजच्या मोहिमेतून देण्यात आला.

धमाल मस्ती अन्‌ स्पर्धा
दादर चौपाटीलाही गोव्यातील बीचसारखे निखळ मौजमजेचे ठिकाण करता येईल; मात्र त्यासाठी आपण चौपाटीची काळजी घेतली पाहिजे, असे दाखवून देण्यासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून धमालमस्ती सुरू झाली. स्वच्छता मोहीम झाल्यावर झुंबा आणि फ्लॅश मॉबचे सादरीकरण करण्यात आले. ‘गल्ली बॉय’ चित्रपटातील रॅपर गॅंगने धमाल केली. ‘बॉम्बे ड्रमर्स’ने आपल्या तालावर उपस्थितांना थिरकायला लावले. शेफ तुषार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झटपट पाककला स्पर्धाही झाली.

WebTitle : marathi NEWS why go goa when you have dadar chaupati in mumbai 

संबंधित बातम्या

Saam TV Live