बेडरूममध्ये भारतीय पुरुष स्वार्थी होतात, महिलांनी शेअर केला अनुभव

बेडरूममध्ये भारतीय पुरुष स्वार्थी होतात, महिलांनी शेअर केला अनुभव

लग्नानंतर महिलांचा सेक्स बद्दल उत्साह कमी होतो. अनेक भारतीय महिलांची हीच कहाणी आहे. मात्र याचं नक्की कारण काय? नक्की बायकोला आपल्या नवऱ्याकडून काय हवं असतं? याचा एका इंग्रजी वृत्तसमुहाने सर्व्हे केलाय. या सर्व्हेमध्ये महिलांनी उत्सुर्तपणे आपलं म्हणणं मांडलंय. या सर्व्हेतून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्यात. लग्नानंतर भारतीय महिलांची सेक्स लाइफ ही फारच बोअरिंग होते किंवा त्यांना सेक्समध्ये फारशी रुची नसल्याचं त्यांनी  सांगितलंय.  

सेक्सबद्दल महिलांची निराशा होण्याची काही महत्त्वाची कारणं आहेत. घरातील रोजचं काम, सासू सासऱ्यांची सेवा, संपूर्ण दिवस मुलांच्या मागे दिवस घालवल्यानंतर महिलेला तिच्या पतीकडून प्रेमाचा स्पर्श हवा असतो. मात्र, पुरुषांकडून भावनात्मक समर्थन मिळत नसल्याने महिलांमधील सेक्स बद्दलची भावना दिवसेंदिवस कमी होत जाते. त्या सेक्सला एखादं काम म्हणूनच करत असतात असा अनुभव महिलांनी बोलून दाखवला.     

यामध्ये मोठा वर्ग हा काम करणाऱ्या महिलांचा आहे. दिवसभर ऑफिसमध्ये काम केल्यानंतर घरच्या कामाची जबाबदारी या पार पाडत असतात. अशातच घरी आल्यानंतर नवऱ्याकडून प्रेम आणि आदराची अपेक्षा बायकोकडून केली जाते. असं जर झालं नाही तर त्यांचे पती फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी बायकोच्या जवळ जात असल्याचा महिलांचा समज होतो.

अनेक महिलांचं असं देखील सांगणं आहे की, नवऱ्याच्या मते प्रेम करणं म्हणजे सेक्स करणं असाच आहे. या व्यतिरिक्त नवऱ्याकडून त्यांच्या इतर कोणत्याही इतर, इतर मागण्या किंवा इच्छा समजून घेतल्या जात नाहीत. त्यामुळे देखील महिलांचं त्यांच्या आपल्या नवऱ्याबद्दलचं लैंगिक आकर्षण कमी होतं.  


भारतात आता कुठे महिला किंवा पुरुषही लैंगिकता या विषयावर बोलायला लागलेत. अशात अनेकदा या विषयवार नवऱ्याशी कसं बोलायचं हा विचार करून लग्न झालेल्या महिला संकोच करतात. याचा परिणाम महिलांच्या लैंगिक आयुष्यावर होतो. 

यात सर्वात जास्त महिलांनी असंही सांगितलं की सेक्स दरम्यान त्यांचा नवरा त्यांची त्यांची खूप काळजी घेतो. त्यानंतर मात्र, बायकोकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं जातं असं अनेक महिलांनी सांगितलंय.   

Web Title | why indian men become selfish when they are in their bed

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com