निवडणुकीच्या धामधुमीत राज ठाकरेंची तोफ पूर्णपणे थंडावलेली

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातलं राजकीय वातावरण आता चांगलंच तापलंय. युती-आघाडी, जागावाटप, एकमेकांच्या पक्षांतून नेत्यांची फोडाफोडी, आयातनिर्यातील प्रचंड उधाण आलंय. मात्र, या सर्व घडामोडींत एका आघाडीवर शांतता दिसतेय. ती आघाडी आहे मनसेची.

मनसेप्रमुख राज ठाकरेंची तोफ या निवडणुकीच्या धामधुमीत पूर्णपणे थंडावलेली दिसतेय. ऑगस्टच्या सुरुवातीला राज ठाकरेंनी ईव्हीएमविरोधात विरोधकांना एकवटण्याचा प्रयत्न केला. सोनिया गांधी, ममता बॅनर्जींची भेट घेतली. मात्र, त्यानंतर ईडीनं 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटिस बजावली आणि त्यांची चौकशीही झाली. या चौकशीनंतर राज ठाकरेंनी या चौकशीचा मला काही फरक पडत नाही, असं विधानही केलं. मात्र, त्या दिवसानंतर राज ठाकरे पुन्हा कुठेच दिसले नाहीत. 

सोशल मीडियातही त्यांचा चांगला वावर असायचा तोही दिसत नाही. अपवाद केवळ अरुण जेटलींना श्रद्धांजली वाहण्याची पोस्ट आणि 2 सप्टेंबरच्या गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा देण्याची पोस्ट. या पोस्टशिवाय राज ठाकरे ऑनलाइनही दिसले नाहीत. नुकताच त्यांनी डोंबिवलीचा दौरा केला. मात्र, त्यातही काही ते बोलले नाहीत. लोकसभा निवडणुकीपासून सत्ताधाऱ्यांवर राज ठाकरेंनी केलेली टीका सर्वांनाच आठवतेय. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची ही शांतता आता प्रकर्षानं जाणवू लागलीय.

WebTitle : marathi news why raj thackeray in not active in the middle of election scenario  

संबंधित बातम्या

Saam TV Live