यंदाची मिस युनिवर्स का आहे खास? हे आहे कारण

गुरुप्रसाद जाधव
बुधवार, 11 डिसेंबर 2019

जिद्द, चिकाटी आणि महत्वाकांक्षा तुम्हाला कुठवर घेऊन जाऊ शकते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे जोजिबिनी टुंजी. ती यंदाची मिस युनव्हर्स ठरली. तिच्या सौंदर्यापेक्षाही तिचा इथपर्यंतचा प्रवास अधिक सुंदर आहे. प्रत्येकाने पाहायला हवा असा आहे. 

गवऱ्या थापणारी विश्वसुंदरी

जिद्द, चिकाटी आणि महत्वाकांक्षा तुम्हाला कुठवर घेऊन जाऊ शकते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे जोजिबिनी टुंजी. ती यंदाची मिस युनव्हर्स ठरली. तिच्या सौंदर्यापेक्षाही तिचा इथपर्यंतचा प्रवास अधिक सुंदर आहे. प्रत्येकाने पाहायला हवा असा आहे. 

गवऱ्या थापणारी विश्वसुंदरी

जोजिबिनी टुंजीच्या डोक्यावर मुकूट सजला. पण यानंतर या मुकुटापर्यंतच्या प्रवासाने जगाला थक्क केलं. डोक्यावर मुकुट घालतानाचा तो क्षण... ज्याने या 26 वर्षांच्या तरुणीचं आयुष्य बदललं. आयुष्यात काही तरी चांगलं घडण्यापूर्वीचे हे आठ सेकंद.

मुकूट चढवलेली  विश्वसुंदरी तुम्ही पाहिलीत. आता याचं विश्वसुंदरीचं हे रुप पाहा. शेणानं घर सारवणारी.. जोजिबिनी. ती मिस युनिव्हर्स झाल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल होतोय. दक्षिण आफ्रिकेची ही तरुणी एका सामान्य कुटुंबातून इथवर पोहोचलेय. पैसे नव्हते म्हणून पदवी पर्यंतचं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. पुढे ती मिस साऊथ आफ्रिका बनली आणि तिन आपलं शिक्षण पूर्ण केलं. 

सौंदर्यवतीचा थक्क करणारा प्रवास

साऊथ आफ्रिकेच्या ईस्टर्न केप मध्ये ती राहते.जोजिबिनी 26 वर्षांची आहे. तिचा जन्म आहे 18 सप्टेंबर 1993 चा. जोजिबिनीने पब्लिक रिलेशन अँड मॅनेजमेंटमध्ये पदवी संपादीत केलीए. 2017 साली ती मिस साऊथ आफ्रिका स्पर्धेत टॉप 26 मध्ये पोहोचली. हाती निराशा आली. पण ती खचली नाही. तिने मेहनत केली. आपल्या ध्येयापर्य़ंत पोहोचण्यासाठी लागणारं सातत्यं तिने टिकवलं. आणि 2019मध्ये तिने हा किताब आपल्या नावे केलाच. 2019चा मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावे करत इतिहासच रचला.
हा किताब पटकावणारी साऊथ आफ्रिकेची ती तिसरी तरुणी ठरली. तर 2011नंतर पहिल्यांदाच एक कृष्णवर्णीय तरुणी मिस युनिव्हर्स झालीए.. 

ब्लॅक अँड ब्युटीफूल जोजिबीनी टुंजी

शेणानं घर सारवणारी ही विश्वसुंदरी आज चर्चेत आहे. चर्चा तिच्या रुपापेक्षाही तिच्या साधेपणाची होते आहे. तिच्या परिस्थितीची होतेय. चर्चा तिच्या जिद्दीची, महत्त्वाकांक्षेची आणि मेहनतीची होतेय. हे काहीतरी नवीन आहे. सुंदरतेची परिमाणं बदलतायत आणि त्यासोबतच व्य़ाख्याही. हा बदल जगाला नव्हे जोजबिनीमुळे बह्मांडाला आणखी सुंदर बनवेल अशी आशा जिवंत ठेवतोय.


संबंधित बातम्या

Saam TV Live