14 एप्रिलनंतरच्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांना सूट मिळणार?

14 एप्रिलनंतरच्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांना सूट मिळणार?

कोरोना विषाणूनं आता भारतात पसरायला जोरदार सुरुवात केलीय. यामुळ साऱ्यांचेच प्रचंड हाल होतायत. घरी बसून आता सगळेच कंटाळलेत. मात्र याहूनही जास्त भयंकर म्हणजे, देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कोलमडली आहे. आणि या अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले असतानाच, कोरोनाला रोखण्याचे अटीतटीचे प्रयत्न केले जातायत. दरम्यान मोदी सरकारने 14एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता हे लॉकडाऊन आणखी वाढवण्याची मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलीय. 

हे लॉकडाऊन वाढवायचं त्याबरोबरच देशाची अर्थव्यवस्थाही कशी सांभाळायची याचा विचार आता सरकार करताना दिसतंय. म्हणूनच लॉकडाऊन दरम्यान दुसऱ्या टप्प्यात नागरिकांना थोडी सूट मिळू शकेल.  जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) डेविड नाबरो यांनीही तसे संकेत दिलेत.

 १४ एप्रिल रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर आर्थिक विकास दर वाढवणारी अनेक कामं सुरू होतील, अशी शक्यता आहे. याचदरम्यान ज्या भागात कोरोनाचे जास्त रुग्ण आहेत, त्या भागात जास्तीत जास्त कडक संचारबंदी करण्यात येईल. आणि ज्या भागात कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी आहे, तिथं लॉकडाऊन शथिल करण्यात येईल. असं WHO ने सुचवलं आहे. यावर मोदी सरकार सध्या विचार करत असलं तरीही, देशाची सध्याची स्थिती पाहता कोरोनाचं थैमान कसं रोखता येईल हाच सर्वात मोठा प्रश्न उभा ठाकलाय. 

कारण, जोपर्यंत हा विषाणू मुळातून नष्ट होत नाही तेव्हापर्यंत त्याचा सामना करणं अनिवार्य असल्याचंही WHOच्या नाबरो यांनी म्हटलंय. भारतानं केलेल्या कारवाईचं आम्ही पूर्ण: समर्थन करतो. आमच्याकडे तपशीलासह माहिती नाही परंतु, लॉकडाऊनद्वारे करोनाचा फैलाव रोखला जाऊ शकतो असं आम्ही समजतो, असंही त्यांनी म्हटलं.

त्यामुळे आता सर्वांचच लक्ष मोदी सरकारच्या निर्णयाकडे लागलंय.

WEB TITLE - marathi news Will citizens get a some frredom in the second lockdown after April 14?
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com