जुलैमध्ये महाराष्ट्रात टोळधाड धडकणार? पाकिस्तानातनं येणाऱ्या टोळधाडीचा धुमाकूळ

साम टीव्ही
शनिवार, 6 जून 2020
  • राज्यातली शेती संकटात; पुन्हा टोळधाडीचं संकट
  • जुलैमध्ये महाराष्ट्रात टोळधाड धडकणार ?
  • पाकिस्तानातनं येणाऱ्या टोळधाडीचा धुमाकूळ

 देशावर एकीकडे कोरोनाचं मोठं संकट असताना दुसरीकडे राज्यावर आणखी एक संकट आलंय.. . पाकिस्तानमधून आलेले टोळ कीटक मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात शिरले आहेत... त्यातच पुढच्या महिन्यांत म्हणजेच जुलैमध्ये पुन्हा एकदा देशात टोळधाडीचं संकट येणार असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने दिला आहे. त्यानंतर केंद्राने राजस्थान आणि मध्य प्रदेशसह 16 राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

देशावर एकीकडे कोरोनाचं मोठं संकट असताना दुसरीकडे राज्यावर आणखी एक संकट आलंय. पाकिस्तानमधून आलेले टोळ कीटक काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात शिरले. पुन्हा एकदा ही टोळधाड महाराष्ट्रात धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेशसह 16 राज्यांना या टोळधाडीसंबंधी इशारा देण्यात आलाय. ही 26 वर्षांतील सर्वांत मोठी टोळधाड आहे.  

शेती खराब करणारी टोळधाड एप्रिल महिन्यात पाकिस्तानातून भारतात आली. महाराष्ट्रात पाकिस्तानातून आलेल्या टोळधाडीनं हैदोस घातला. शेतावर पिकं कमी असल्यामुळे टोळ सध्या झाडे आणि अन्य खाद्यपदार्थांना हे टोळ लक्ष्य बनवतायंत. पिकांची अनुपलब्धता असल्यामुळेच टोळ पाकिस्तानातून इतकं अंतर पार करून भारताच्या विविध राज्यांत शिरले आहेत, आता पुन्हा एकदा जुलै महिन्यात पिकांचं नुकसान करणाऱ्या टोळधाडीचा इशारा देण्यात आलाय.


संबंधित बातम्या

Saam TV Live