मोठी बातमी! ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस आजच येणार? ऑक्सफर्ड आज करणार मोठी घोषणा

साम टीव्ही
गुरुवार, 16 जुलै 2020
  • ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस आजच येणार ?
  • लसीसंबंधी ऑक्सफर्ड आज करणार मोठी घोषणा
  • कोरोनाप्रतिबंधक लस आज येणार ?
  • तिसऱ्या टप्प्यातील चाचण्याही पूर्ण

ऍस्ट्राझेन्का कंपनीतर्फे तयार होत असलेल्या ऑक्सफर्डच्या कोरोना प्रतिबंधक लसीबाबत आजच घोषणा होण्याची शक्यता आहे. लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वीपणे पूर्ण झालीय. ब्राझीलमध्ये गेल्या महिन्यात या लसीसंबंधी तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पार पडली. त्यामुळे आज कदाचित या लसीसंबंधी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. ही लस शरिरात अँटीबॉडीज म्हणजे प्रतिकार करणाऱ्या पेशी तयार करत असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे गेल्या पाचसहा महिन्यांपासून सुरू असलेली कोरोनावरील लसीची प्रतिक्षा संपण्याची शक्यता आहे. विशेष पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटनं ऍस्ट्राझेंका कंपनीसोबत करार केल्यानं पुण्यातही ही लस तयार होणारंय. 

नेमकी ही ऍस्ट्राझेन्का कंपनी कुठली आहे आणि सीरमसोबत लस बनवण्यासाठी कसे प्रयत्न सुरू आहेत, पाहा व्हिडीओ - 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live