सुर्यग्रहणामुळे कोरोनाचा नायनाट होणार? वाचा, सुर्यग्रहण आणि कोरोनाचा नेमका संबंध काय?

साम टीव्ही
रविवार, 21 जून 2020
  •  
  • सुर्यग्रहणामुळे कोरोनाचा नायनाट होणार?
  • चेन्नईच्या वैज्ञानिकाचा दावा कितपत खरा? 
  • सुर्यग्रहण आणि कोरोनाचा नेमका संबंध काय?

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरस संदर्भात चेन्नईच्या एका वैज्ञानिकानं अजब दावा केलाय. काय आहे दावा पाहूयात

अख्खं जग कोरोनाच्या विळख्यात आहे. कोरोनातून सुटका करण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या जातायत. लसी, औषधं बनवली जातायत. पण, अजूनही कोरोनावर ठोस लस उपलब्ध झालेली नाही. त्यातच आता नवनवे तर्कवितर्क लावले जातायत...सुर्यग्रहण असल्याचा फायदा घेत चेन्नईचे वैज्ञानिक डॉ. केएल सुंदर कृष्ण यांनी सुर्यग्रहणामुळे कोरोना नष्ट होईल असा दावा केलाय. पण, खरंच सुर्यग्रहण आणि कोरोनाचा काही संबंध आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत. त्यामुळे या वैज्ञानिकांच्या दाव्यामुळे चर्चेला उधाण आलंय. नक्की काय दावा केलाय ते तुम्हीच पाहा.

सूर्यग्रहणानंतर उत्सर्जित झालेल्या विखंडन ऊर्जेमुळे कोरोना व्हायरस नष्ट होईल.पहिल्या न्युट्रॉनमधून निघालेल्या कणाच्या संपर्कात आल्यानं कोरोना व्हायरसचा नायनाट होईल.26 डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या सुर्यग्रहणानंतर सुर्यमंडळात ग्रहांच्या स्थितीत बदल झाला.  या बदलामुळे कोरोना व्हायरससाठी पोषक वातावरण निर्माण झालं होतं. असा दावा डॉ.के.एल यांनी केलाय. पण, या दाव्याबाबत आमच्या टीमने त

ज्ज्ञांकडून अधिक माहिती मिळवली. त्यावेळी डॉ. केएल सुंदर कृष्ण यांचा हा दावा विज्ञानाला धरून नसल्याचं अनेक तज्ज्ञांनी सांगितलं.

कोरोना व्हायरस आणि सुर्यग्रहण यामध्ये थेट कोणताही संबंध नाही. त्यामुळे सुर्यग्रहणानंतर कोरोनाचा व्हायरस नष्ट होईल हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. त्यामुळे अशा दाव्यांवरती विश्वास ठेवू नका.


संबंधित बातम्या

Saam TV Live