विंबल्डनमध्ये जोकोविचचे पुनरागमन; केव्हिन अँडरसनला दिली मात 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 16 जुलै 2018

लंडन : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने कोपरावरील शस्त्रक्रियेनंतर पुनरागमनाची मोहीम यशस्वी केली. विंबल्डनमध्ये मॅरेथॉन लढा दिलेल्या केव्हिन अँडरसनला हरवून त्याने पुरुष एकेरीचे विजेतेपद संपादन केले.

लंडन : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने कोपरावरील शस्त्रक्रियेनंतर पुनरागमनाची मोहीम यशस्वी केली. विंबल्डनमध्ये मॅरेथॉन लढा दिलेल्या केव्हिन अँडरसनला हरवून त्याने पुरुष एकेरीचे विजेतेपद संपादन केले.

याबरोबरच जोकोविचने ग्रॅंड स्लॅम यशाची चाहत्यांची अपेक्षापूर्ती केली. अँडरसनने उपांत्यपूर्व फेरीत रॉजर फेडररला हरविले होते. त्यानंतर उपांत्य फेरीत त्याला अमेरिकेच्या जॉन इज्नरविरुद्ध सहा तास 36 मिनिटे झुंजावे लागले होते. साहजिकच त्याची दमछाक झाली होती. तिसरा सेट टायब्रेकमध्ये घालवित त्याने प्रयत्न केले, पण जोकोविचला तो विजयापासून रोखू शकला नाही.

अँडरसनची सुरवात डळमळीत झाली. पहिल्या गेममध्ये फोरहॅंड बाहेर गेल्यानंतर त्याच्याकडून डबल फॉल्ट झाली. त्यामुळे पहिल्याच गेममध्ये त्याच्या सर्व्हिसवर गंडांतर आले. जोकोविचने पहिले 15 पैकी 12 गुण जिंकत पकड घेतली. 21 मिनिटांतच तो 5-1 असा आघाडीवर होता. हा सेट गमावल्यानंतर अँडरसनने उजव्या दंडावर वैद्यकीय उपचार करून घेतले.

दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचने सातत्य कायम राखले. यातही अँडरसनने पहिल्याच गेममध्ये सर्व्हिस गमावली. मग पाचव्या गेममध्ये त्याला आणखी एका ब्रेकला सामोरे जावे लागले. या सेटमध्ये अँडरसनने तुलनेने जास्त प्रतिकार केला; पण दीर्घ रॅलीमध्ये जोकोविचने वर्चस्व राखले. त्याने कोर्टलगत मारलेल्या फटक्‍यांचा वेग धूर्तपणे बदलला. त्यामुळे अँडरसन बॅकफुटवर गेला. अँडरसनने 2-5, 30-40 अशा स्थितीस पहिला ब्रेकपॉइंट मिळविला. त्यानंतर 18 फटक्‍यांची रॅली झाली. त्यात अँडरसनचा बॅकहॅंड चुकला. ड्यूसनंतर जोकोविचने सलग दोन गुण जिंकले. जोकोविचने तिसरा सेट टायब्रेकमध्ये गेल्यानंतर त्यात तीनच गुण गमावले.

WebTitle marathi news wimbledon novak djokovic beats kevin anderson


संबंधित बातम्या

Saam TV Live