सावरकरांच्या मुद्द्यावरुन हिवाळी अधिवेशनाचं वातावरण तापलं

साम टीव्ही न्यूज
सोमवार, 16 डिसेंबर 2019

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन हिवाळी अधिवेशनाचं वातावरण तापलंय... 
सावरकरांच्या मुद्द्यावर आक्रमक भाजप आमदार. 'मी सावकर' असं लिहिलेलं भगव्या रंगाच्या टोप्या घालून, विधानभवनात पोहोचले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन हिवाळी अधिवेशनाचं वातावरण तापलंय... 
सावरकरांच्या मुद्द्यावर आक्रमक भाजप आमदार. 'मी सावकर' असं लिहिलेलं भगव्या रंगाच्या टोप्या घालून, विधानभवनात पोहोचले.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. अधिवेशन सुरू होताच, विरोधी पक्ष भाजप सावरकरांचा मुद्दा विधानभवनात उपस्थित करणार आहेत. 

सावकरांच्या मुद्द्यावरुन प्रमुख विरोधी पक्ष भाजप, शिवसेनेला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहेत. हिवाळी अधिवेशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची पहिली परीक्षा ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीवरुनही विरोधक प्रचंड आक्रमक राहणार आहेत.

तर विरोधकांना सामोरे जातांना सत्ताधारीही पूर्ण तयारीनिशी विरोधकांचे डावपेच उधळून लावण्यासाठी मैदानात उतरले असून सरकारकडून या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होते का याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. दरम्यान, सावरकरांच्या मुद्द्यावरुन आज अधिवेशन गाजण्याची शक्यताय.

ताज्या अपडेट्स आणि बातम्यांच्या सविस्तर विश्लेषणासाठी पाहात राहा...
साम टीव्ही न्यूज ||LIVE||

LINK :: https://www.youtube.com/watch?v=HLSD_Eog4_Q

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!

Web Title - Winter session
 


संबंधित बातम्या

Saam TV Live