आता PF काढा 3 दिवसात; असा काढा तुमचा PF  

आता PF काढा 3 दिवसात; असा काढा तुमचा PF  

आता पीएफ काढणं अगदी सोपं होणाराय. कारण पीएफ काढायची पद्धत आता एकदम सोपी केली जाणाराय. EPFO कडून यासाठी खास प्रयत्न के़ले जातायत. EPFO कमिश्नर सनील बर्थवाल यांनी हा माहिती दिली. EPFO इ-तपासणी प्रणाली सुरु करणाराय. याचा हेतू तपासणीची प्रक्रिया सुलभ करणे आणि योग्य गरजांशिवाय समोरासमोर चौकशीची प्रक्रिया कमी करणं हा आहे. त्यामुळं पीएफ मिळणं आता ३ दिवसांत शक्य होणाराय.  सध्या पीएफचे पैसे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं काढता येतात. पण ऑनलाईनसाठी तब्बल ३० दिवसांची प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळं नोकरादारांना त्रास सहन करावा लागतो, हाच त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला जाणाराय.

कसा काढाल पीएफ ?

  • सगळ्यात आधी http://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/
  • या वेबसाईटला भेट द्या. युएन, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून अकाऊंट लॉगइन करा. 
  • त्यानंतर मॅनेज टॅबवरील केवायसी पर्यायावर क्लिक करा. त्यावर आधार, पॅनकार्ड आणि मागचा तपशील पडताळणी केली आहे की नाही याविषयी माहिती विचारली जाईल. 
  • त्यानंतर ऑनलाईन सेवा पर्यायावर क्लिक करा. त्यामध्ये स्क्रीनवरील सदस्य तपशील दिसेल. त्यावर क्लेम फॉर्म सबमिट करण्यासाठी तुम्हाला क्लेमसाठी प्रोसीडवर क्लिक करावं लागेल.

त्यामुळं आता पीएफसाठी दिवसेंदिवस तरसण्याची वेळ संपली असं म्हणायला हरकत नाही.

WebTitle : marathi news withdrawing PF is now easy know the process 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com