VIDEO | दारुविना कशी ही तडफड! वाचा, तळीरामांचा मिशन दारुचा हा मजेदार किस्सा....

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 14 एप्रिल 2020

तळीरामांचा जीव दारूत अडकलेला असतो. पण दारू मिळाली नाही तर तळीराम कोणत्या थराला जातात, हे बघून तुम्हीही चक्रावून जाल.

तळीरामांचा जीव दारूत अडकलेला असतो. पण दारू मिळाली नाही तर तळीराम कोणत्या थराला जातात, हे बघून तुम्हीही चक्रावून जाल.

कुणी दारू देतं का दारू ... या तळीरामाला दारू देतं का दारू ... ही अवस्था झालीय राज्यातल्या खच्याक ग्रुप च्या मेंबरची . लॉकडाऊनचा या  तळीरामांना जबरी फटका बसलाय. सकाळी सकाळी चुळ भरायला दारु लागणाऱ्यांच्या तर स्वप्नातही दारू दिसायला लागलीय. अखीर मै सब्र का बांध टुट गया. घसा ओला करायचं ठरलं आणि गाठलं महसूल विभागाचं गोदाम.

खच्याक ग्रुपच्या मेंबरची बैठक झाली . टार्गेट ठरलं. वेळ ठरली . माल किती उचलायचा ही ठरलं. मिशन दारू चोरी सक्सेस करायचीच अन् झुलत घरी जायचं ही ठरलं . ते लेझीम खेळताना झुलत्यातना आगदी तस्सं. रात्रीच्या आंधारत नाशिकच्या महसूल विभागाच्या गोदाम मेंबरनं फोडलं 50-60 विदेशी दारू उचलली अन् पळ काढला. रोज देशी पेणाऱ्यांच्या हाताला विदेशी माल लागला. मेंबर खूष ना भावा.

पर दोस्तो कानून के हात लंबे होते है . पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत दोघा संशयितांना कोपच्यात घेतलंया.  तपास होईल, बाकीचे मेंबर घावत्याली. पण कसं हाय दारू हाळू हाळू जीवावर बेतती अन् कोरोना झटकेपट जीवावर बेततो . किमान दारूला नाय तर कोरोनाल तरी घाबरा की राव. अन् गप आपलं घरात बसायचं गुमान.

Web Title - marathi news  Without alcohol people gone mad...


संबंधित बातम्या

Saam TV Live