सॅनिटायझरचा अतिवापरही धोकादायक, सॅनिटायझरच्या भडक्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू

साम टीव्ही
सोमवार, 27 जुलै 2020
  • सॅनिटायझरच्या भडक्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू
  • नाशिकच्या महेबुबनगरमधली घटना
  • सॅनिटायझरचा अतिवापरही धोकादायक

सध्या घराघरात गरजेचा झालेला सॅनिटायझर एखाद्याच्या मृत्यूचं कारण बनू शकतो. कदाचित यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरंय.

नाशिकच्या वडाळा गावातील मेहबूबनगरमध्ये मेणबत्तीवर चुकून सॅनिटायझर फवारलं गेल्याने एका विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मेणबत्तीच्या ज्योतीसोबत सॅनिटायझरचा संपर्क होऊन भडका उडाल्याने ही विवाहिता ९० टक्क्यांपर्यंत भाजली होती. रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून घराघरात सॅनिटायझरचा वापर वाढलाय. पण सॅनिटायजरचा अतिवापर धोकादायक असल्याचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलाय.

  • सॅनिटायझरच्या अतिवापराने त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात
  • सॅनिटायझरमध्ये घातक केमिकल नसल्याची खातरजमा करा
  • सॅनिटाझरच्या अतिवापराने त्वचेवरील चांगल्या बॅक्टेरियांचाही नाश होतो
  • साबण आणि पाणी उपलब्ध नसेल तरच सॅनिटायझरचा वापर करा
  • सॅनिटायझरऐवजी मास्कचा वापर करा, गरम पाणी प्या आणि हात नीट धुवा
  • देशात सध्या कोरोनाने थैमान घातलंय. त्याच्या नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांमध्ये सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला असला तरीही त्याचा तारतम्याने वापर करणंच योग्य ठरेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live