तिने चक्क ट्रेन मधून मारली उडी.....

तिने चक्क ट्रेन मधून मारली उडी.....

मुंबई : मुंबईमध्ये मोबाईल चोरीला जाण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. बोरिवली स्थानकावर अशीच एक घटना धक्कादायक घडलीये. चोरट्यानं एका महिलेचा फोन तिच्या हातातून हिसकावत पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि ट्रेनच्या बाहेर उडी घेतली. मात्र या शूर महिलेने आपला फोन वाचवण्यासाठी प्राणांची बाजी लावलीये. यामुळे ही महिला गंभीर जखमी झाली आहे.

नक्की काय घडलं.. 

पीडित महिला पालघरहून घरी परतत असताना ही घटना बोरीवली स्थानकात घडली.  संध्याकाळी ६.५० वाजता तिनं पॅसेंजर ट्रेन पकडली. ८.११ वाजता पॅसेंजर बोरिवली स्थानकात पोहोचली. यावेळी महिलेनं तिच्या घरी फोन केला पण नेटवर्क नसल्यामुळे ती ट्रेनच्या दारात जाऊन उभी राहिली. ट्रेन सुरू होताच चोरट्यानं तिच्या हातातून मोबाइल हिसकावला, मात्र महिलेनं त्याच्या दंडाला पकडलं. त्यामुळे त्यानं धावत्या ट्रेनमधून उडी घेतली. त्याच्यासोबत महिलेनंही देखील उडी घेतली. मात्र चोरट्यानं त्या महिलेला फरफटत नेलं. या सर्व प्रकारात महिला गंभीर जखमी झाली आहे. हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर काही लोकं या महिलेच्या मदतीसाठी धावले. मात्र तोपर्यंत चोरट्याला पळण्यात यश आलं होतं. परिसरातल्या लोकांनी या महिलेवर प्रथमोपचार केले. पोलिसांकडून या महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं . 

याप्रकरणी पीडित महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या घटनेत तपास करताना सिसिटीव्ही फुटेजची पाहणी केलीये. याबाबत बोलताना पोलिसांनी आरोपीचं नाव वसिम शेख असं असल्याचं म्हटलंय. वासिम हा एक सराईत गुन्हेगार आहे असं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलंय. पोलिसांनी आरोपी वसिम शेख याचा शोध सुरू केला आहे.         
   

Web Title: marathi news woman literally jumped off the train after theif stole her mobile

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com