धक्कादायक! पतीनं हातगाडीवरुन भाजी घेतली म्हणून पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 11 एप्रिल 2020

अगदी क्षुल्लक कारणावरुन एका महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केलीय. पतीने एका हातगाड्यावरुन भाजी-पाला खरेदी केल्यामुळे रागाच्या भरात, पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सेलूमध्ये घडली. 

सेलूमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. अगदी क्षुल्लक कारणावरुन एका महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केलीय. पतीने एका हातगाड्यावरुन भाजी-पाला खरेदी केल्यामुळे रागाच्या भरात, पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सेलूमध्ये घडली. सेलू शहरातील पारिजात कॉलनीत ही धक्कादायक घटना घडली.

पाहा व्हिडीओ -

 

 काल सकाळी आत्महत्या करणाऱ्या महिलेने नवऱ्याला बाजारातून भाजीपाला आणण्यास सांगितले होते. परंतू त्यांनी भाजीपाला बाजारातून न आणता रस्त्यावरील हातगाडीवरुन खरेदी केला. आणि याच क्षुल्लक कारणावरुन आधी पती-पत्नीमध्ये वाद झाला. आणि त्याच रागात विवाहितेने राहत्या घरातून गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान, कोरोना विषाणुच्या भितीतून हा प्रकार घडला असल्याची चर्चा सर्वत्र आहे. सध्या कोरोनाचं थैमान तर आहेच, त्यातच यांसारख्या घटनांचं प्रमाणही वाढतंय. त्यामुळे भातासमोर कोरोनाला रोखण्याचं मोठं आव्हान आहे. 

Web Title - marathi news Woman suicide due to very small reason

 


संबंधित बातम्या

Saam TV Live