माझ्यामुळे कोणाला कोरोना नको, त्यापेक्षा मीच निघून जाते अस म्हणत, तीने जीवन संपवलं...

साम टीव्ही
शनिवार, 28 मार्च 2020

कोराना व्हयरसच्या पार्श्वभूमीवर विवध अफवा पसरवल्या जातायत. त्यामुळे एका वृद्ध महिलेनं कोरोनाच्या धास्तीनं नदीत उडी घेऊन आत्महत्या केलीय. 

कोरोनाच्या भीतीनं बऱ्याच अफवांना काही लोक बळी पडतायत. त्यातच आता कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढतच चाललाय. त्यमुळे प्रशासनाकडून अधिक काळजी घेण्यात येतेय. आता प्रशासनाने लॉकडाऊन जाहिर केल्यावरही लोक त्याचं किती पालन करतात. त्यावरच कोरोनाची परिस्थिती अवलंबून आहे. मात्र सोशल मिडीया किंवा लोकंकडून मिळणाऱ्या अफवांना एक महिला बळी पडली आहे. कोरोनाच्या धास्तीनं एका वृद्ध महिलेनं आत्महत्या केलीय. 

'मिथेनॉल प्यायल्याने कोरोना बरा होतो' या अफवेमुळे इराणमध्ये 300 जणांचा मृत्यू

कोरोना व्हायरसच्या धास्तीने वृद्ध महिलेनं आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. कोल्हापूर जवळील शिये इथला हा धक्कादायक प्रकार आहे. तीन दिवसांपूर्वी शिये पुलावरून या वृद्ध महिलेने पंचगंगा नदीत उडी घेतली होती. गुरुवारी संध्याकाळी तिचा मृतदेह सापडलाय.  रात्री नऊच्या सुमारास हनुमान नगर, शिये येथे कसबा बावड्याच्या हद्दीत नदी किनार्‍यावर त्यांचा मृतदेह मिळाला.   
श्रीमती मालुबाई आकाराम आवळे ( वय ६८, रा.  खुशबू इंडस्ट्रीज, एमआयडीसी, शिरोली, मुळ रा.  वंदूर ता. कागल ) असे त्यांचे नाव आहे. कोरोनामुळे नव्हे, मात्र कोरोनाच्या धास्तीने जिल्ह्यातील हा पहिला बळी घेतला आहे.  कोरोनाच्या भीतीने आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. 

गुरुवारी सकाळी त्या अचानक घरातून बाहेर पडल्या. त्यांच्या मुलाने व नातवंडांनी त्यांचा शोध घेतला. काल उशिरा त्यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची माहिती दिली. दरम्यान नदी पात्रात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मृतदेह मिळालेल्या ठिकाणी बाळू आवळे यांना नेण्यात आले. माझ्यामुळे कोणाला कोरोनाची लागण नको, त्यापेक्षा मीच निघून जाते असे आई म्हणायची असे बाळू आवळे यांनी सांगितले. 

Web Title - Marathi news woman's sucide in river because of corona virus fake news 


संबंधित बातम्या

Saam TV Live