आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला हॉकी संघाचा कझाकिस्तानवर दणदणीत विजय 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

भारताच्या महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगळवारी कझाकिस्तानवर 21-0 असा दणदणीत विजय मिळवला.

भारताकडून गुरजित कौरने यावेळी सर्वाधिक चार गोल केले. पहिल्या सत्रापासून भारताने आघाडी घ्यायला सुरुवात केली.

वंदना कटारिया, लालरेमसियामी आणि नवनीत कौर यांनी प्रत्येकी तीन गोल केले. नवज्योत कौर आणि लिलिमा यांनी प्रत्येकी दोन गोल संघाच्या विजयात आपला वाटा उचलला, त्याचबरोबर उदिता, नेहा गोयल, मोनिका आणि दीपग्रेस यांनी प्रत्येकी एक गोल केला.

संबंधित बातम्या

Saam TV Live