महाराष्ट्रातून दिवसाला 60 जणी गायब; कुठे जाताता या मुली आणि महिला?

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

राज्यात अल्पवयीन मुली, तरुणी, महिला खरंच सुरक्षित आहेत का ? असा प्रश्न विचारावासा वाटतो कारण 17 महिन्यांमध्ये राज्यात सुमारे ३३ हजार अल्पवयीन मुली, तरुणी, महिला हरविल्याच्या तक्रारी पोलिसांमध्ये दाखल झाल्यात. त्यात मोठ्या शहरांमधील तक्रारींची संख्या अधिक आहे. 

कधी प्रेमसंबंधातून, तर कधी घरगुती कलहातून तरुणी अथवा विवाहिता घर सोडून जातात. त्यांना फूस लावून पळवून नेलं जात असल्याचे आत्तापर्यंतच्या पोलिस तपासातून समोर आले आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागांमध्ये महिलांच्या बेपत्ता होण्याचं तसंच हरवल्याचं प्रमाण अधिक आहे.

त्यातही महानगरांचा समावेश असून मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे आणि नाशिक ही शहरे यात प्रामुख्याने आहेत. दीड वर्षात 33 हजार अल्पवयीन मुली, तरुणी, महिला गायब झाल्यात म्हणजे दिवसाला महाराष्ट्रात सरासरी 60 महिला गायब होत आहेत. ही आकडेवारी धक्कादायक आणि महिला सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर आणणारी आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live