नागपूर : लाडक्या गणरायाच्या विसर्जन मिरवणूकीत महिलांच्या सुरक्षेवर भर

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 23 सप्टेंबर 2018

नागपूर : तब्बल दहा दिवसांच्या मुक्‍कामानंतर गणेशाचे विसर्जन 23 आणि 24 सप्टेंबरला होत असून, त्याकरिता शहर पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. विशेषत: वाहतूक विभागाने सार्वजनिक गणेश मंडळांकरिता मार्ग निर्धारित केले आहेत. तर, तलावाच्या काठावर कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या वर्षी 1200 गणेश मंडळांसाठी तब्बल 4 हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त असून सीसीटीव्हीसह वॉच टॉवरचीही व्यवस्था यावर्षी करण्यात आली आहे. तलाव काठावरील गर्दी टाळण्याकरिता वाहतूक पोलिसांनी काही विशेष सोय केली आहे.

नागपूर : तब्बल दहा दिवसांच्या मुक्‍कामानंतर गणेशाचे विसर्जन 23 आणि 24 सप्टेंबरला होत असून, त्याकरिता शहर पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. विशेषत: वाहतूक विभागाने सार्वजनिक गणेश मंडळांकरिता मार्ग निर्धारित केले आहेत. तर, तलावाच्या काठावर कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या वर्षी 1200 गणेश मंडळांसाठी तब्बल 4 हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त असून सीसीटीव्हीसह वॉच टॉवरचीही व्यवस्था यावर्षी करण्यात आली आहे. तलाव काठावरील गर्दी टाळण्याकरिता वाहतूक पोलिसांनी काही विशेष सोय केली आहे. विशेषत: वाहनांमुळे रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम होणार नाही, याकरिता पार्किंगचेही नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी तलावनिहाय निर्धारित केलेल्या मार्गांवरच सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणूक न्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सोशल मिडियावरून आवाहन
नागपूर पोलिसांनी वॉट्‌सऍप, ट्‌विटर, फेसबूक आणि अन्य सोशल मिडियावरून बाप्पाच्या विसर्जन शांतते पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. डीजेचा वाजवू नये, ध्वनिप्रदूषणाची मर्यादा पाळावी. माता-भगीनींना सुरक्षित वाटेल असे वातावरण ठेवावे. पोलिसांना सहकार्य करावे. वाहतूक नियम आणि कायद्याचा सन्मान करण्याचेही आवाहन पोलिस आयुक्‍त डॉ. बी.के. उपाध्याय यांनी जारी केलेल्या व्हिडियोतून केले आहे.

विसर्जन सुरक्षेसाठी सज्ज
गणेश विसर्जनासाठी पोलिस विभाग पूर्णपणे सज्ज आहे.मिरवणुकीदरम्यान जर कुणी गडबड केल्यास गय केली जाणार नाही. पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष सुचना दिल्या आहेत. संशयीत हालचाली व असामाजिक तत्वांवर अंकुश ठेवण्यासाठी बळाचा वापर करण्यात येईल. सीसी टीव्ही कॅमेरे, वॉच टॉवर, क्‍युआरटी, सीआरपीएफ आणि उपायुक्‍त दर्जाचे सहा पोलिस अधिकारी सुरक्षा व्यवस्थेबाबत सतर्क राहतील.
- डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलिस आयुक्‍त.

वाहतूकीची कोंडी टाळणार
तलवाच्या ठिकाणी बॅरीकेडींग करण्यात येणार आहे. मोठ्या वाहनांवर असलेल्या गणपतींना तलावापर्यंत सोडण्यात येईल तर कार, ऑटो किंवा टेम्पोत असलेल्या गणपतींना एक किमी अंतरावर वाहन पार्क करावे लागणार आहे. सकाळी आठ वाजतापासूनच वाहतूक पोलिस रस्त्यावर उतरतील. दुचाकीनांही तलावापर्यंत सोडण्यात येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, जेणेकरून वाहतूकीची कोंडी होऊन सर्वसामान्यांना त्रास होणार नाही. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्त्यावरी सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाहतूक पोलिसांची कॅमेरे सज्ज असलेली सर्व्हिलन्स व्हॅन तैनात करण्यात येणार आहे.
- राजतिलक रौशन, पोलिस उपायुक्‍त, (वाहतूक शाखा)

Web Title: concentration on women s safety in ganpati immersion in nagpur


संबंधित बातम्या

Saam TV Live