सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या मजुरासाठी वाघ ठरला काळ

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 7 मार्च 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मध्य चांदा वनविभागअंतर्गत येणाऱ्या चुनाळा बिटाला लागून असलेल्या महसूल विभागाचा सर्व्हे नं. 336 मध्ये चुनाळा गावातील मारोती टेकाम हे सरपण गोळा करण्यासाठी गेले होते. सरपण गोळा करीत असताना अचानक वाघाने हल्ला केला. या हल्यात टेकाम यांच्या घटनास्थळीच मृत्यू झाला.

राजुरा (जि. चंद्रपूर) : सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या मजुरावर वाघाने हल्ला केला. यात मजूर जागीच ठार झाला. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील विहीरगाव बिटात घडली. या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे. उध्दव मारोती टेकाम असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मध्य चांदा वनविभागअंतर्गत येणाऱ्या चुनाळा बिटाला लागून असलेल्या महसूल विभागाचा सर्व्हे नं. 336 मध्ये चुनाळा गावातील मारोती टेकाम हे सरपण गोळा करण्यासाठी गेले होते. सरपण गोळा करीत असताना अचानक वाघाने हल्ला केला. या हल्यात टेकाम यांच्या घटनास्थळीच मृत्यू झाला. टेकाम यांच्या शरीराचा अर्धा भाग वाघाने फस्त केला होता. ही घटना शनिवारी उघळकीस आली. या घटनेने परिसरात वाघाची दहशत पसरली आहे. 

माजी आमदार निमकरांनी केले सांत्वन

वाघाच्या हल्ल्यात मजुराचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच माजी आमदार तथा भाजप नेते सूदर्शन निमकर यांनी मृताचा कुटुंबीयांची भेट घेतली व सांत्वन केले. 

वाघाला जेरबंद करा अन्यथा आंदोलन

राजुरा तालुक्‍यात वाघाचा हल्ल्यांत मृत झालेल्या व्यक्तींचा आकडा दिवसेगणिक फुगत आहे. नित्य होणारे वाघ्रदर्शन, अधूनमधून होणाऱ्या हल्ल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलन करण्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. 

Web Title Worker Dies In Tiger Attack In Chandrapur District


संबंधित बातम्या

Saam TV Live