जगातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा, वाचा कोणात्या देशाची काय आहे स्थिती...

साम टीव्ही
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

जगात महासत्ता म्हणून ओळख असलेल्या अमेरिकेत कोरोनाने हाहाकार माजवलाय. अमेरिकेत कोरोनामुळं मृत्यूमुखी पडलेल्याची संख्या  1 लाख 58 हजार 907वर पोहोचलीय. कोरोना रुग्णांच्या संख्येत  गेल्या 24 तासात 48 हजार नवीन रुग्णांची भर पडलीय.https://www.saamtv.com/marathi-news-vipul-pawar-commits-suicide-11144

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलंय. या विषाणूने आतापर्यंत 6 लाख 96 हजार नागरिकांचा बळी घेतला आहे. तर कोरोनाग्रस्तांची संख्या 1 कोटी  84 लाख 34 हजारांवर पोहोचलीय. गेल्या 24 तासात जगभरात 1 लाख 98 हजाराहून अधिक कोरोनाग्रस्त आढळून आलेत. दरम्यान, आतापर्यंत 1 कोटी 16 लाख रुग्ण उपचारानंतर बरे झालेत.  जगातील जवळपास सर्व प्रमुख देश या विषाणूविरोधात लढत आहेत. दरम्यान या विषाणूला रोखण्यासाठी बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलंय.

जगात महासत्ता म्हणून ओळख असलेल्या अमेरिकेत कोरोनाने हाहाकार माजवलाय. अमेरिकेत कोरोनामुळं मृत्यूमुखी पडलेल्याची संख्या  1 लाख 58 हजार 907वर पोहोचलीय. कोरोना रुग्णांच्या संख्येत  गेल्या 24 तासात 48 हजार नवीन रुग्णांची भर पडलीय. सध्या अमेरिकत 48 लाख 61 हजाराहून जास्त कोरोनाबाधित  आहेत. 24 लाख 45 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत  94 हजार 702 रुग्णांचा  कोरोनामुळं मृत्यू झालाय. 

ऑनलाईन शिक्षणाचा धसका घेत विद्यार्थ्याची आत्महत्या, मोबाईलला नेटवर्क नसल्याने विपूल होता तणावात

तर 27 लाख 51 हजाराहून अधिक जणांना कोरोनाची लागण झालीय. गेल्या 24 तासात ब्राझीलमध्ये 17 हजार नवीन रुग्ण आढळून आले . ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं तिथल्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडलाय.

रशियात कोरोनाबाधितांची  संख्या 8 लाख 56 हजारांवर पोहचलीय. तर 14 हजार 207 जणांचा कोरोनामूळे मृत्यू झालाय. दरम्यान मॉस्को शहरात सर्वाधिक रुग्ण आढळले असून इथल्या बळींची संख्याही जास्त आहे.

असं असताना महाराष्ट्र ज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा वेग वाढतोय. काल नव्या आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची जास्त होती. त्यामुळे आता राज्याचा रिकवरी रेट 63 टक्क्यांपेक्षा जास्त झालाय. राज्यातील मृत्यूदर हा सध्या 3.52 टक्के इतका आहे.. सध्या राज्यात 1 लाख 47 हजार 18 एक्टिव्ह रुग्ण आहेत.


संबंधित बातम्या

Saam TV Live