इंडिया आणि न्यूझीलंड मॅच संबंधी महत्त्वाची बातमी | #CWC19

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 जून 2019

आज वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये लढत होणार आहे. दरम्यान, या सामन्यावर पावसाचं सावट कायम आहे. शेवटच्या मिळालेल्या माहितीनुसार आजचा सामना नियोजित षटकांपेक्षा कमी खेळवला जाण्याची शक्यता आहे. काही वेळात मॅच अम्पायार्स परिस्थितीचा आढावा घेऊन आपला निर्णय देणार आहेत. 

सलग दोन सामन्यात विजय मिळवून टीम इंडियानं मिशन वर्ल्डकपची दिमाखात सुरूवात केलीय. मात्र शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळं टीम इंडियाला धक्का बसलाय. शिखर धवनच्या अनुपस्थितीत के.एल.राहुल सलामीला येणार आहे. तर चौथ्या स्थानावर विजय शंकर की दिनेश कार्तिकला संधी मिळतेय याबाबत उत्सुकता आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरोधात टीम इंडियानं दिमाखदार विजय मिळवला होता. 

न्यूझीलंडविरोधात विजय मिळवून सलग तिसरा विजय मिळवण्याचं लक्ष्य टीम इंडियाचं असणार आहे. 

WebTitle : marathi news World Cup 2019 India vs New Zealand match update 

संबंधित बातम्या

Saam TV Live