भारत पाकिस्तान आज भिडणार, संपूर्ण जगाचं महामुकाबल्याकडे लक्ष

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 16 जून 2019

मँचेस्टर : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्यापासून ज्या सामन्याची उत्सुकता तमाम क्रिकेटविश्‍वाला लागून राहिली होती, तो भारत- पाकिस्तान सामन्याचा महामुकाबला उद्या होत आहे. पावसाचा लपंडाव आणि ताणलेली कमालीची उत्सुकता दोन्ही संघांतील खेळाडूंच्या क्षमतेचा कस पाहणारी ठरणार आहे. 

मँचेस्टर : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्यापासून ज्या सामन्याची उत्सुकता तमाम क्रिकेटविश्‍वाला लागून राहिली होती, तो भारत- पाकिस्तान सामन्याचा महामुकाबला उद्या होत आहे. पावसाचा लपंडाव आणि ताणलेली कमालीची उत्सुकता दोन्ही संघांतील खेळाडूंच्या क्षमतेचा कस पाहणारी ठरणार आहे. 

भारत सर्व क्षेत्रात पाकिस्तानच्या पुढे आहे. विश्‍वकरंडक क्रिकेटमध्ये तर आत्तापर्यंतच्या सहाही लढतींत विजय मिळवलेला आहे. उद्या "फादर्स डे'च्या दिवशी होणारी ही लढत सर्वार्थाने श्रेष्ठत्वाची ठरणार आहे. दोन वर्षांपूर्वी याच इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला पराभूत केल्यामुळे पाकिस्तानला आशेचा किरण दिसत असला तरी वर्ल्डकमधला सर्व इतिहास भारताची "वडीलधारी' कामगिरी कथन करत आहे.

दहा संघांच्या या स्पर्धेत सध्याच्या गुणतक्‍त्यात भारत चौथ्या, तर पाकिस्तान आठव्या स्थानावर आहे. भारताची अपराजित कामगिरी आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर गेल्या रविवारी मिळवलेला विजय आत्मविश्‍वास सुदृढ करणारा आहे. याच ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तानचा संघ बुधवारी पराभूत झालेला आहे.

बेभरवशाचा संघ म्हणून पाकिस्तानची ओळख आहे. इतिहास ब्रेक करण्यासाठी प्रयत्नशील असणारा पाकिस्तानचा संघ दडपणाखाली असेल; पण त्याचवेळी भारतीय कसे संयम राखतात यावर सामन्याची दिशा ठरणार आहे. गेल्या चॅम्पियन्स स्पर्धेत पाकचा हिरो ठरणाऱ्या शतकवीर फखर झमानला बुमराने चकवले होते, परंतु तो नोबॉल ठरला होता. उद्या अशा चुका भारताला टाळाव्या लागतील. 

हवामानानुसार रणनीती

दोन्ही संघांनी मानसिकदृष्ट्याही मोठी तयारी केली असली तरी हवामानानुसार रणनीती तयार करावी लागणार आहे. पावसाचा मोठा व्यत्यय येण्याचा अंदाज दोन दिवसांपूर्वी देण्यात आला होता; पण आता त्यात बदल झाला आहे. दुपारनंतर हलक्‍या पावसाचे भाकीत असले तरी त्यानुसार संघचना आणि नाणेफेकीनंतरचा निर्णय अवलंबून असेल. 

 

Web Title: World Cup 2019 Match Between India and Pakistan

 


संबंधित बातम्या

Saam TV Live