पुढील ४८ तास नेटकऱ्यांना सहन करावा लागणार इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा त्रास

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

नेटकऱ्यांना पुढील ४८ तास नेटवर्क कनेक्टिव्हिटीचा त्रास सहन करावा लागू शकतो. जगभरातील मोठ्या आणि काही महत्त्वाच्या डोमेन सर्व्हरच्या देखभालीचं काम केलं जाणार असल्यामुळे जगभरातील नेटकऱ्यांना इंटरनेट वापरताना त्रास सहन करावा लागणारे.

देखभालीच्या कामामध्ये 'क्रिप्टोग्राफीक की'मध्येही बदल केला जाणार असल्यामुळे जगभरातील इंटरनेटवर डाऊन टाईम येणार आहे. मात्र, केल्या जाणाऱ्या या देखभालीच्या कामामुळे सध्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या सायबर हल्ल्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे. 

इंटरनेटच्या देखभालीचं काम  Internet Corporation for Assigned Names and Numbers म्हणजेच ICANN द्वारा करण्यात येणार आहे.

इंटरनेट बंद राहिल्यास त्याचा दैनंदिन जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. ATM किंवा नेट बँकिंगचे व्यवहार ठप्प होण्याचीही शक्यात आहे

WebTitle : marathi news world wide internet users to face difficulties while using internet

संबंधित बातम्या

Saam TV Live