जगातील सर्वात मोठ्या रावणाचं दहन

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

 

 

जगातील सर्वात मोठा रावणाचा पुतळा चंदीगडमध्ये बनवण्यात आलाय. अगदी रामायणात वर्णन केल्याप्रमाणे दिसावा असंच रावणाचं रूप आहे.  या महाकाय रावणाच्या पुतळयाचं आज म्हणजेच विजयादशमीच्या मुहूर्तावर दहन केलं जाईल.
या रावण दहनासाठी चंदीगडच्या धनास मैदानात जय्यत तयारी करण्यात आलीय. या रावणाची खासियत म्हणजे त्याची उंची तब्बल 221 फूट इतकी आहे. हा रावण ना पडू शकेल ना त्याला गळती लागेल. जवळपास 70 ते 100 किलोमीटर वेगवान वाऱ्यांचा सामना करण्याची क्षमता या पुतळ्यात आहे. हा पुतळा अडीच लाख वर्ग फुटांच्या जागेत उभारण्यात आलाय. पुतळ्याच्या जवळ जाण्यास कुणालाही परवानगी नाही. 800 फुटांवरून रिमोटच्या सहाय्यानं या पुतळ्याचं दहन केलं जाईल. 
या रावणाच्या पुतळ्याची खासियत म्हणजे कुठूनही त्याच्याकडे पाहिलं तर तो तुम्हालाच पाहतोय असं वाटेल. बराडा अंबालातील मूर्तीकार निवासी राणा तेजिंदर सिंह चौहान यांनी या पुतळ्याची निर्मिती केलीय. सध्याच्या घडीला जवळपास 40 सुरूक्षारक्षक या पुतळ्याच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेत. तर विजयादशमीच्या दिवशी अड़चशे बाऊन्सर्स तैनात असणार आहेत. त्यामुळे जगातील सर्वात मोठ्या रावण दहनाची उत्सुकता तमाम देशवासियांना लागलीय. 

WebTitle: marathi news worlds biggest ravan dahan will be torched on vijayadashmi 


संबंधित बातम्या

Saam TV Live