हवाई दलाच्या AN-32 या विमानाचे अवशेष सापडले

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 जून 2019

गेल्या तीन जूनला आसामच्या जोरहाट विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर बेपत्ता झालेल्या भारतीय हवाई दलाच्या AN-32 या विमानाचे अवशेष तब्बल सात दिवसानंतर सापडले. अरुणाचल प्रदेशच्या लिपो या भागापासून जवळपास 16 किलोमिटर अंतरावर मिग 21 या हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या शोधपथकाला हे अवशेष दिसलेत.

समुद्रसपाटीपासून जवळपास 12 हजार उंचीवर हे ठिकाण आहे. AN-32 या विमानाचे अवशेष दिसलेल्या ठिकाणी शोधमोहीम तीव्र करण्यात आलीय. बेपत्ता विमानाने आसाममधील जोरहाटमधून गेल्या सोमवारी दुपारी १२.२७ मिनिटांनी मेचूकाच्या दिशेने उड्डाण भरलं होतं. उड्डाणानंतर ३५ मिनिटांनी विमानाचा रडारशी असलेला संपर्क तुटला.

भारतीय वायुसेना, नौदल आणि इस्रोच्या सहाय्याने शोधकार्य सुरु होतं. दरम्यान, AN-32 या विमानात 8 कर्मचारी आणि 5 जवान होते. 
 
WebTitle : marathi news the wreckage of the missing An32 spotted by IAF

संबंधित बातम्या

Saam TV Live