कुस्ती खेळताना मानेवर पडल्यानं पैलवान निलेश विठ्ठल कंदुरकर अत्यवस्थ 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 एप्रिल 2018

उपचारांसाठी निलेशच्या कुटुंबियांना हवा मदतीचा हात 

कोल्हापूरमध्ये कुस्ती खेळताना मानेवर पडल्यानं एका होतकरू तरूणाला गंभीर दुखापत झालीय. निलेश विठ्ठल कंदुरकर असं या जखमी खेळाडूचं नाव आहे. त्याच्यावर सध्या कराडमधल्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. निलेशला झालेली दुखापत इतकी गंभीर आहे की त्याची मान मोडलीय. त्याच्यावर उपचार करण्यासाठी किमान 10 ते 12 लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहेत. निलेशची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. त्य़ामुळे एव्हढा खर्च कसा करायचा असा प्रश्नही त्याच्या कुटुंबियांना पडलाय. साम टीव्हीच्या माध्यमातून आम्ही लोकांना आवाहन करत आहोत की निलेशला मदतीचा हात द्या. एक नवीन आयुष्य मिळण्यासाठी प्रार्थना करा.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live