चीनमधील वूहान शहर आजपासून खुलं,चीनची कोरोनावर मात

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 8 एप्रिल 2020

तब्बल ८२ हजाराहुन अधिक कोरोनाग्रस्त आणि ३३०० लोकांचा बळी घेतल्यानंतर चीननं कोरोनावर मात केलीय.

कोरोनाच्या जन्म जिथे झाला, त्या वुहानमध्ये आज आनंदाचं वातावरण असणार आहे, कारण,  कोरोनाचं उगमस्थान असलेलं वुहान आजपासून खुलं होणार आहे. 76 दिवसांच्या लॉकडाऊननंतर आजपासून इथले नागरिक घराची लक्ष्मण रेषा ओलांडतील. तब्बल ८२ हजाराहुन अधिक कोरोनाग्रस्त आणि ३३०० लोकांचा बळी घेतल्यानंतर चीननं कोरोनावर मात केलीय. सध्या वुहानमध्ये कोरोना संक्रमणाचे नवे रुग्ण समोर आलेले नाहीत. अतिशय काटेकोरपणे लॉकडाऊन पाळल्यानं चीन सरकारला कोरोनाला धूळ चारणं शक्य झालं आहे . 
याच पार्श्वभूमीवर शहरात एका सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. जिथं नागरिकांना या लढ्यात मोठ्या हिंमतीनं लढणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेसचं कौतुक करण्यात आलं. शिवाय कोरोनानं मृत्यू झालेल्यांनाही श्रद्धांजली देण्यात आली. वुहानला पुन्हा एकदा त्याच्या जुन्या रुपात पाहण्याचं भाग्य या नागरिकांना लाभलं.

पाहा सविस्तर व्हिडीओ - 


संबंधित बातम्या

Saam TV Live